Manoj Jarange Warns Ajit Pawar: तुम्हाला पश्चाताप करावा लागेल; मनोज जरांगेंचा थेट अजित पवारांना इशारा

Dhananjay Munde vs Manoj Jarange: जरांगे आणि मुंडे संघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहचलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंची स्टार प्रचार म्हणून नियुक्ती केलीय. त्यामुळे जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झालेत... जरांगेंनी अजित पवारांना थेट इशारा दिलाय...जरांगे नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange warns Ajit Pawar after NCP names Dhananjay Munde as star campaigner; political tension rises in Beed.
Manoj Jarange warns Ajit Pawar after NCP names Dhananjay Munde as star campaigner; political tension rises in Beed.Saam Tv
Published On

धनंजय मुंडे विरुद्ध मनोज जरांगे यांच्यात संघर्ष टोकाला गेलाय.. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केल्यानं मनोज जरांगे चांगलेच भडकलेत... धनंजय मुंडेंना ताकद दिल्यानं 2029 मध्ये अजित पवारांना पश्चाताप करावा लागेल, असा इशारा जरांगेंनी दिलाय..

खरंतर धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय.. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय.. तर जरांगेंच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या 2 आरोपींना अटक करण्यात आलीय.. तर जरांगेंनी थेट ऑडिओ क्लीप ऐकवत मुंडेंवर निशाणा साधलाय.. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळत जरांगेच्या नार्को टेस्टची मागणी केलीय..मात्र जरांगेंनी आता आपल्यासोबतच धनंजय मुंडेंचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केलीय..

मुंडेंना लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका बसला होता.. मात्र विधानसभा निवडणुकीत समीकरण बदललं... आता जरांगेंनी धनंजय मुंडेंची स्टार प्रचारकांच्या यादीत वर्णी लागल्यानं अजित पवारांना लक्ष्य केलंय.. त्यामुळे अजित पवार आगामी काळातील निवडणुकीतील फटका टाळण्यासाठी धनंजय मुंडेंना डावलणार की जरांगेंची मागणी फेटाळून लावत मुंडेंना ताकद देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात जरांगे विरुद्ध मुंडे हा संघर्ष ओबीसी विरुद्ध मराठा या वळणावर जाण्याचीच शक्यता अधिक आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com