Manoj Jarange Patil Health : मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, वजन घटले; डॉक्टरांनी सांगितली नेमकी कारणे

Manoj Jarange Patil Health deteriorated : नऊ दिवस उपोषण केल्यानं मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांचे १२ किलो वजन घटले आहे.
Manoj Jarange Patil Health deteriorated latest Update
Manoj Jarange Patil Health deteriorated latest UpdateSaam TV
Published On

Manoj Jarange Patil Health Update :

मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार उपसणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. नऊ दिवस उपोषण केल्यानं जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांचे जवळपास १२ किलो वजन घटले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी पुढील दहा ते बारा दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषणासारखे हत्यार उपसले होते. सप्टेंबरमध्ये ते जवळपास १७ दिवस उपोषणाला बसले होते. सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची आंतरवाली सराटीमध्ये भेट घेऊन मुदत मागितली होती. त्यानंतर जरांगेंचे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सभा झाल्या.

सरकारला दिलेली मुदत उलटून गेल्यानंतर सव्वा महिन्यातच ते दुसऱ्यांदा उपोषणाला बसले. हे उपोषण जवळपास ९ दिवस सुरू होते. अखेर सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. ९ दिवस उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे.

जरांगेंची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची किडनी आणि लिव्हरला सूज आल्याचेही सांगितले. त्यांचे वजन १२ किलोंनी घटले आहे. काही दिवस त्यांनी पाणी न प्यायल्याने प्रकृती खालावली आहे, असेही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

Summary

आतापर्यंत काय काय झालं?

  • मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची आरपारची लढाई सुरू

  • सप्टेंबरमध्ये आंतरवाली सराटीत १७ दिवस उपोषणाला बसले

  • सरकारच्या शिष्टमंडळानं मुदत मागितल्यानंतर जरांगेंचे उपोषण मागे

  • जरांगेंच्या राज्यभरात अनेक ठिकाणी सभा

  • मुदत उलटून गेल्यानंतर पुन्हा उपोषणाला बसले

  • राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलने, उपोषण

  • मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण

  • ९ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगेंचे उपोषण मागे

  • उपोषणामुळं मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

  • जरांगेंना उपचारासाठी गुरुवारी रात्री शहरातील खासगी रुग्णालयात केले दाखल

  • जरांगेंच्या किडनी आणि लिव्हरला सूज

  • जरांगेंचे वजन १२ किलोंनी घटले

  • उपचारांसाठी रुग्णालयात १० ते १२ दिवस राहण्याचा डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टरांनी काय सांगितलं?

मनोज जरांगे पाटील सप्टेंबरमध्ये उपोषणाला बसले होते. उपोषण सोडल्यानंतर पुरेशी विश्रांती न घेतल्यानं त्यांनी राज्यभर दौरे केले. अनेक ठिकाणी सभा घेतल्या.

त्यानंतर काहीच दिवसांनी जरांगे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले. पाणीही न प्यायल्याने त्यांचे वजन घटले आहे. काल, शुक्रवारी दुपारी त्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी दहा ते बारा दिवस उपचारासाठी रुग्णालयात राहावे लागणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Edited by - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com