Manoj Jarange Patil: विधानसभेत लढायचं की पाडायचं, जरांगे पाटील मोठी घोषणा करणार; मराठा बांधवांची आज निर्णायक बैठक

Manoj Jarange Patil Maratha Reservation: आचारसंहितेनंतर मनोज जरांगे आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत. या संदर्भात जालन्यामध्ये त्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे.
Manoj Jarange Patil: विधानसभेत लढायचं की पाडायचं, जरांगे पाटील मोठी घोषणा करणार; मराठा बांधवांची आज निर्णायक बैठक
Manoj Jarange Patil Rally Saamtv
Published On

अक्षय शिंदे, जालना

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभेत उमेदवार न देता ही सत्ताधाऱ्यांना दणका दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला थेट विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे राजकीय हत्यार उपसणार असून ते या विधानसभा निवडणूकीत उमेदवार उभा करायचे की पाडायचे याबाबत जरांगे आज अंतिम निर्णय घेणार आहेत. आज सकाळी 10 वाजल्या पासून समाजाशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय ते जाहीर करणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 14 महिन्यापासून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळाव या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या मागणीसाठी त्यांनी आजपर्यंत सहा वेळा अमरण उपोषण देखील केलय .मात्र त्यांची मागणी सरकारनं मान्य केली नाही. आज आचारसंहितेनंतर मनोज जरांगे आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत. या संदर्भात जालन्यामध्ये त्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज जरांगे पाटील काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची काल रात्री संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. राज्यामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे उमेदवार उभा करणार आहे त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड पाठिंबा देणार असून ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड उमेदवार उभा करतील त्या ठिकाणी मनोज जरांगे पाठिंबा द्यावा असा एक प्रस्ताव संभाजी ब्रिगेडने मनोज जरांगे यांना दिलाय.. तर मनोज जरांगे यांनी विधानसभेत अपक्ष उमेदवार उभा करण्यापेक्षा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून उमेदवार उभे करावे असा देखील प्रस्ताव मनोज जरांगे यांनी दिल्याचं संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते डॉ.तारक यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil: विधानसभेत लढायचं की पाडायचं, जरांगे पाटील मोठी घोषणा करणार; मराठा बांधवांची आज निर्णायक बैठक
Maharashtra Politics: महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपावर तब्बल ९ तास खलबतं, आज काँग्रेसची दिल्लीत बैठक, उमेदवार फायनल होणार

दरम्यान, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मौलाना सज्जाद नोमानी यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेटघेतली. संभाजीनगर मध्ये एका हॉटेल मध्ये ही भेट मध्यरात्री झाली. सज्जाद नौमानी यांची तब्येत बरी मनोज जरांगे पाटील स्वतः भेटायला आले. यावेळी दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीनंतर भविष्यात काहीही होऊ शकते असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

Manoj Jarange Patil: विधानसभेत लढायचं की पाडायचं, जरांगे पाटील मोठी घोषणा करणार; मराठा बांधवांची आज निर्णायक बैठक
Beed Accident : बीडमध्ये १५ मिनिटांत २ भीषण अपघात, कारने दोन-तीन पलट्या खाल्ल्या; २ महिन्याच्या मुलीचा हात तुटला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com