पीककर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला मॅनेजरची मारहाण

जालन्यातील भोकरदनमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरसह बँकेतील इतर अधिकारी आणि शिपायांनी पीककर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे.
State Bank Of India
State Bank Of Indiaलक्ष्मण सांगळे
Published On

लक्ष्मण सांगळे

जालन्यातील भोकरदनमध्ये (Bhokardan) स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State bank of India) मॅनेजरसह बँकेतील इतर अधिकारी आणि शिपायांनी पीककर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. दत्तू शेळके असं मारहाण करण्यात आलेल्या शेतकऱ्याचं नाव असून तो भोकरदन तालुक्यातील गव्हाण संगमेश्वर येथील रहिवासी आहे. पीककर्ज काढण्यासाठी हा शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गेला होता. (Manager beats up a farmer who went to the bank to get a peak loan)

बँकेत जाण्यासाठी लाईनमध्ये हा शेतकरी उभा असताना शिपायाने बँकेचे गेट बंद केलं आणि आता वेळ संपली उद्या या असं सांगितलं. यावरून या शेतकऱ्याने मॅनेजरकडे पीककर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केली असताना मॅनेजरने या शेतकऱ्याला तुझ्या बापाचा नौकर नाही असं म्हणत शिवीगाळ केली. यावेळी शिपाई आणि बँकेतील अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आता होत आहे.

दरम्यान, शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या मुजोर बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना बदाडून काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com