गोसिखुर्द धरणाच्या कारभारामुळे भंडाऱ्यात 'क्रुत्रीम महापूर'?

जलसंपदा विभागाने दिलेल्या सूचने नुसार गोसिखुर्द धरण प्रशासनाने आपल्या पाणी पातळीत वाढ करण्यात सुरुवात केली आहे.
गोसिखुर्द धरणाच्या कारभारामुळे भंडाऱ्यात 'क्रुत्रीम महापूर'?
गोसिखुर्द धरणाच्या कारभारामुळे भंडाऱ्यात 'क्रुत्रीम महापूर'? Saam TV

भंडारा : गोसिखुर्द धरणाने (Gosekhurd Dam) भंडारा जिल्ह्यात क्रुत्रिम महापुर आल्याचं उघड झाले आहे. गोसिखुर्द धरणाच्या जलसाठ्यात वाढ करण्यात आल्याने भंडारा जिल्ह्यातील (Bhandara District) अनेक गावातील शेतकऱ्यांना बॅकवॉटरचा मोठा फटका बसला होता परंतु आता चक्क लोकांच्या घरात पाणी घुसल्याने महापुराची स्थिति पहायला मिळत आहे. ही स्थिति दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी नसून चक्क भंडारा शहरा लगत असल्याने आता हा विषय चिंतेचा विषय ठरत आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या सूचने नुसार गोसिखुर्द धरण प्रशासनाने आपल्या पाणी पातळीत वाढ करण्यात सुरुवात केली आहे, त्यांमुळे अद्यापही संपादित न झालेल्या शेतशिवारात सुध्दा बॅकवॉटर शिरले होते. मात्र आता हे पाणी लोकांच्या घरा जवळ पोहचले आहे. भंडारा शहरात ग्रामसेवक कॉलनी, भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुरकडे पहायला मिळत आहे. सुरुवातीला गोसिखुर्द धरणाचे बॅकवॉटर साहुली, पिपरी, चिचोली, खैरी, दवडीपार, निमगाव या गावापर्यंत आले होते. आता तर चक्क शहरातील ग्रामसेवक कॉलनीत पाणी आले आहे. ह्या ठिकाणी केवल 58 पैकी 32 घरांचे पुर्नवासन झाले असून 26 घरांचे पुर्नवासन बाकी आहे, त्यांमुळे गत वर्षी आलेला महापुर शहरवासीय अनुभवत आहे.

गोसिखुर्द धरणाच्या कारभारामुळे भंडाऱ्यात 'क्रुत्रीम महापूर'?
सांगलीकरांना गुड न्यूज! विदेशातुन आलेले सर्व प्रवाशी निगेटिव्ह

गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा संपूर्ण वापर करता यावा म्हणून नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसापासून गोसिखुर्द धरण 100 टक्के भरून ठेवण्यात येत आहे, तसा आदेशच जलसंपदा विभागाने दिला आहे. त्यामुळे गोसिखुर्द धरणाची पाणी पातळी 245-246 मिटर पर्यंत नेण्यात येणार आहे. सध्या धरणाची पाणी पातळी 244.800 मिटर असून 199.600 स्वेअर हेक्टर जमीन पाण्याखाली आली आहे. मागील वर्षी 244.500 मिटर पाण्याची पातळी असताना 190.600 स्वेअर हेक्टर जमीन पाण्याखाली आली होती. त्यामुळे मागील वर्षिच्या तुलनेत केवळ 10 स्वेअर हेक्टर जमीन पाण्याखाली आली असल्याच्या दावा गोसिखुर्द प्रशासनाने केला आहे.

याशिवाय गोसिखुर्द धरनाने 223 स्वेअर हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली असल्याचे ही सांगण्यात येत आहे. एकट्या भंडारा जिल्ह्याच्या विचार करता 34 पूर्ण गाव 11 अंश बाधित गाव व 70 गावातील शेतजमीन अधिग्रहित केली आहे. त्यामुळे जर गोसिखुर्द धरणाचे बैक वाटर आले तर केवळ 81 गाव जे सुरुवातीला अधिग्रहित करण्यात आले त्यातच पाणी पाणी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकंदरित जिल्ह्यातील गोसिखुर्द धरण सिंचनासाठी महत्वपूर्ण मानले जात असतांना केवळ प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह रहवासी त्रस्त ठरत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com