सांगली: सांगलीच्या वाळवा तालुक्यातील मौजे बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे (वय- 22) या तरुणावर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नाग पकडून त्याचे सोबत व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर (Social media) प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बावची येथील प्रदीप अशोक अडसुळे याने नाग पकडून त्याचे सोबत व्हिडिओ (Video) तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. सदरची कारवाई विजय माने उपवनसंरक्षक सांगली, डॉ अजित साजने सहाय्यक वनसंरक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा, सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर व अमोल साठे वनरक्षक बावची आणि निवास उगले व भगवान गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.
हे देखील पहा-
खरे म्हणजे नाग पाहिला तरी अनेकांची भीतीने गाळण उडत असते. पण सांगलीतील प्रदीप अडसुळे मात्र नागाबरोबर जीवघेणे स्टंट करत होता. एवढ्यावरच तो थांबायचा नाही, तर याचे व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट (Post) करत असायचा. त्यांच्या व्हिडीओंना मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्सची संख्या देखील मोठी होती. नागासोबत त्याचे जीवघेणे धाडस अन् प्रताप सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले असतील. त्यामुळे त्याला हे व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी आणखी उत्साह येत होता.
परंतु, ही बाब सांगलीच्या विनविभागाच्या निदर्शनास आली होती. या प्रकरणी वन विभागाने वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत प्रदीप अशोक अडसुळेवर गुन्ह्याची नोंद करुन त्याला ताब्यात घेतले आहे. सध्याच्या तरुणाईमध्ये स्टंटची क्रेज वाढलेली दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओंमध्ये धोकादायक स्टंट बघायला मिळत आहेत. अनेकवेळा हे व्हिडीओ फॉलोअर्स वाढवण्यासाठी देखील केले जातात. यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. शिवाय संबंधित जनावरालाही हानी होऊ शकते. दरम्यान सापासोबत अशाप्रकारचे स्टंट करताना ते जीवावर बेतण्याची शक्यता सर्वाधिक असते. स्टंट करताना विषारी साप चावून अनेकदा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.