Mahadev Jankar News:...तर बहीण पंकजा मुंडे यांना रासपात आणून मुख्यमंत्री करेल; महादेव जानकर यांचा नेमका रोख कुणाकडे?

Mahadev Jankar News: 'आता बहीण पंकजा मुंडे यांना त्रास देत आहात. तर पंकजा मुडे यांना रासपात आणून मुख्यमंत्री करेल,असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे.
Mahadev Jankar News
Mahadev Jankar NewsSaam tv
Published On

Mahadeve Jankar News: राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे परभणीच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान, महादेव जानकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य केलं आहे. 'आता बहीण पंकजा मुंडे यांना त्रास देत आहात. तर पंकजा मुडे यांना रासपात आणून मुख्यमंत्री करेल,असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची सध्या राज्यभर 'जनस्वराज यात्रा' सुरू आहे. त्याचा आजचा टप्पा गंगाखेड विधानसभा मतदारसंघात होता. त्यामुळे गंगाखेडचे रासप आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी महादेव जानकर यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर जनसंपर्क कार्यालयात झालेल्या सत्कार कार्यक्रमात आपली आगामी भूमिका जाहीर केली. यावेळी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर प्रसारमाध्यांशी बोलताना जानकर म्हणाले, 'गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे मेले तरी मला सोडून जाणार नाहीत. माझे 20/25 आमदार निवडून आले तर माझी बहीण (पंकजा मुंडे ) आणि देवेंद्र फडवणीस हे मला फोन करतील की आता काय करायचे'.

Mahadev Jankar News
Amit Shah Pune Visit: पीएम मोदींनंतर अमित शाह पुणे दौऱ्यावर, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वागताला

विकासाच्या दृष्टीने आमदार रत्नाकर गुट्टे हे चांगले काम करतात, पहिला आमदार हा रासपाचा आहे. निवडून आले तर आम्ही आता उपमुख्यमंत्रिपद मागू. माझी इज्जत गुट्टे यांनी राखली. आम्ही आजही भाजपबरोबर युतीत आहोत. केसीआर व अरविंद केजरीवाल यांचे मला फोन आले. याबाबत काय निर्णय घ्यायचा आम्ही बसून ठरवू'.

दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठं खळबळजनक विधानही केलं. सर्व जागा गेल्या होत्या, जर गुट्टे निवडून आले नसते तर मला आत्महत्याच करावी लागली असती ,माझं स्वार्थ होता म्हणून मी गुट्टे यांच्यासाठी प्रचाराला थांबलो होतो, असं विधान जानकर यांनी केलं.

Mahadev Jankar News
Amaravati News: अमरावती हिंसाचार प्रकरण, भाजपचे अनिल बोंडे, प्रवीण पोटे यांच्यासह ३० आरोपींची निर्दोष सुटका

दरम्यान, उपस्थितांशी बोलताना जानकर यांनी मोठं वक्तव्य केलं. 'माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तरी मी दबावात येणार नाही. माझ्याकडे साखर कारखाना, सूत गिरणी नाही. त्यामुळे मला धमकीचा प्रश्न येत नाही. मी सामान्य माणसांना शहाणं करणारा व्यक्ती आहे. हे मोठे पक्ष छोट्या पक्षांना कसे खातात, हे आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे काय अवस्था होईल. आता बहीण पंकजा मुंडे यांना त्रास देत आहेत. तर पंकजा मुडे यांना रासपात आणून मुख्यमंत्री करेल, अशा इशारा जानकर यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com