भाजपच्या खेळीनं मित्रपक्ष सैरभैर, भाजपला शह देण्यासाठी शिंदेसेना-NCP एकत्र?

Shiv Sena Shinde NCP Ajit Pawar Alliance: राज्यात महायुतीत जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु आहे... त्यात जागा वाटपात सन्मानजनक जागा मिळत नसल्यानं मित्रपक्षांनीच भाजपविरोधात दंड थोपटलेत... मात्र हे नेमकं कुठं घडलंय ?
Leaders of Shiv Sena (Shinde faction) and NCP (Ajit Pawar) during discussions amid growing seat-sharing tensions with BJP ahead of municipal elections.
Leaders of Shiv Sena (Shinde faction) and NCP (Ajit Pawar) during discussions amid growing seat-sharing tensions with BJP ahead of municipal elections.Saam Tv
Published On

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगा भरती सुरु आहे... आणि याच मेगा भरतीमुळे महायुतीतील तिढा सुटता सुटेना.... त्यातच भाजप सन्मानजनक जागा देत नसल्यानं शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सैरभैर झालीय... त्यामुळेच नाशिकमध्ये महायुतीला तडा गेलाय...शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला शह देण्यासाठी एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय... त्यासाठी रात्री उशिरापर्यंत शिंदे सेनेचे मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. नाशिकमध्ये महायुतीत फुटीची ठिणगी का पडलीय?

महायुतीत जागा वाटपांवरुन ओढाताण

65 नगरसेवक असल्यानं भाजप 80 पेक्षा जास्त जागा लढवण्यावर ठाम

शिंदेसेनेकडून 45 जागांची मागणी, मात्र भाजपकडून 35 जागांचाच प्रस्ताव

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागांची मागणी, मात्र भाजपकडून फक्त 6 जागा देण्याचीच तयारी

ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये भाजपने ठाकरेसेना, मनसे, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावला. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांची कोंडी झालीय... त्यामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याची रणनीती आखत भाजपनं 122 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केल्यानं महायुतीत मीठाचा खडा पडल्याची चर्चा आहे.. हे फक्त नाशिकपुरतंच मर्यादित नाही.. तर सोलापूरमध्येही महायुतीची बोलणी फिस्कटल्याचं समोर आलंय.. त्यामुळे सोलापूरात शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी युतीची चर्चा सुरु केलीय...या चर्चेत नेमकं काय घडलंय?

सोलापूरात 102 पैकी 50 टक्के जागांवर दोन्ही पक्षांचं एकमत

शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 50-50 फॉर्म्युल्यावर एकमत

शिंदेसेना 51 तर अजित पवारांची राष्ट्रवादी 51 जागा लढण्याची शक्यता

खरंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे 48 तास बाकी आहेत.. मात्र जागा वाटपाचा तिढा कायम आहे.. त्यामुळे आपली फरफट रोखण्यासाठी शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपविरोधात दंड थोपटलेत... मित्रपक्षांनीच आव्हान दिल्याने भाजपला फटका बसणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com