वर्चस्वाच्या वादातून कोकणातही महायुतीत वादाची ठिणगी पडलीय... आणि त्याला कारण ठरलीय भगवी शाल.. होय.. भगवी शाल पांघरण्यावरुन भाजपचे मंत्री नितेश राणे आणि उदय सामंतांमध्ये कलगितुरा रंगलाय...
खरंतर राणे विरुद्ध सामंत हा कोकणातील पारंपरिक संघर्ष.. मात्र आता दोन्ही नेते महायुतीत असल्याने तडजोडी कराव्या लागत असतानाच उदय सामंतांनी गणेशोत्सवात भगव्या शालीवरुन नितेश राणेंना डिवचलं.. तर राणेंनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.. त्यानंतर हा वाद शमला असं वाटत असतानाच पुन्हा 11 सप्टेंबरला नितेश राणेंनी उदय सामंतांच्या रंगीबेरंगी मफलरवरुन डिवचलंय.. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही नेते आमने-सामने आलेत.. मात्र महायुतीतील वाद हा फक्त रत्नागिरीपुरताच मर्यादित नाही... तर रायगडमध्येही पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात संघर्ष सुरु आहे. तर ठाण्यात भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंना टार्गेट केलंय..
ठाण्यात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेंमध्ये पारंपरिक संघर्ष सुरु आहे.. त्यात भाजपने नाईकांना बळ देऊन शिंदेंची कोंडी केलीय.. तर नाईकांनी थेट शिंदेंचा बालेकिल्ला असलेली ठाणे महापालिका जिंकण्याचा निर्धार केलाय.. दुसरीकडे कोकणात राणे विरुद्ध सामंत यांच्यात जुना राजकीय वाद आहे... त्यातच लोकसभा निवडणुकीत सामंतांनी युतीधर्म पाळला नसल्याचा राणेंचा दावा आहे.. तर डीपीडीसी निधीवरुन निलेश राणे आणि सामंत यांच्यात धुसफूस असल्याची चर्चा आहे.
फक्त मंत्रालयातच नाही तर शिंदेसेना आणि भाजपमधील अंतर्गत वादाचं लोण ठाणे आणि कोकणापर्यंत पसरलंय.. आता कोकणात भगव्या शालीवरुन राजकारण करण्याऐवजी कोकणवासीयांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही नेते प्रयत्न कधी करणार? हा कोकणवासीयांच्या मनातील अनुत्तरीत प्रश्न आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.