बुलढाणा : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त सरंक्षण सेवेसाठीच्या (CDS) परिक्षेत बुलडाण्यातील अपूर्व गजानन पडघान हा देशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या परिक्षेचा निकाला आज ता.24 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या महत्वपूर्व सैन्य दलातील लष्कर, नौसेना आणि वायूसेना या तिन्ही गटातून प्रथम आलेला अपूर्व हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मेरा येथील रहीवासी आहे. युपीएससीच्या (UPSC) वतीने उमेदवारांना लेखी परिक्षा देण्यासाठी लष्करी ॲकडमी, नेव्हल ॲकडमी आणि वायूदल ॲकडमीमधून निवडण्यात आले होते.
यानंतर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सैन्य दलाच्या मुख्यालयात घेण्यात येणार आहे. जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम व अभ्यासाचे योग्य नियोजनाच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्याचा अपूर्व गजानन पडघान हा विद्यार्थी युपीएससी परिक्षेत देशात प्रथम आला आहे. अपूर्व पडघान याने मिळलेल्या यशामुळे बुलडाणा जिल्हयाचे नाव पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. बुलडाणा जिल्हयातील चिखली तालुक्यातील मेरा बु या छोटयाशा गावातील अर्पूव पडघान याने मिळविलेल्या या अदभूतपूर्व यशामुळे अपूर्व या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अपूर्व हा लहानपणापासून अभ्यासात हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. अपूर्वचे वडिल गजानन पडघान हे विवेकानंद विद्या मंदिराचे माजी विद्यार्थी असून ते सद्या जळगाव येथे पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत, तर आई शालीनी या गृहीनी आहे. अपूर्व याने एनआयटी नागपूर येथून बी.टेक मेकॅनिकल इंजिनिअरींग पूर्ण केले आहे. महाविद्यालयीन जीवनापासून युपीएससी परिक्षेत आपल्याला यश प्राप्त करण्याचे ठरविले असल्यामुळे महाविद्यालया पासूनच युपीएससी परिक्षेच्या तयारीला लागला होता. अपूर्वने केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर युपीएससी परिक्षेत देशात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. अभ्यासाचे योग्य नियोजन व परिश्रमाच्या जोरावर आपल्याला घवघवीत यश प्राप्त करता आले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.