Weather Update: राज्यात हुडहुडी! दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याच्या थंडीची शक्यता

Maharashtra Weather Update: पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहू शकते त्यामुळे तापमानातही चढ-उतचार असतील, अशी माहिती हवामान खात्याने दिलीये.
Weather Update
Weather UpdateSaam TV

Winter Season:

संपूर्ण राज्यावर ऐन दिवाळीमध्ये आलेलं पावसाचं सावट दूर झालं आहे. दिवाळीची सुरुवात होताच वातावरणात गारवा निर्माण झालाय. दिवाळीच्या उत्तरार्धात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीये. पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहू शकते त्यामुळे तापमानातही चढ-उतचार असतील, अशी माहिती हवामान खात्याने दिलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Weather Update
Weather Update: राज्यात पुढील ४८ तासांत अवकाळी पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून अलर्ट

पुढील आठवडाभर राज्यात साकळी धुके पडण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर पुढील दोन दिवसांत मुंबई पुण्यासह संपूर्ण राज्यात थंडी परतणार आहे. गेल्या २ दिवसांत राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानंतर काल आणि आज सर्वत्र आकाश निरभ्र आहे. शनिवारी दुपारी कमाल तापमानात घट झाली होती. मुंबई आणि पुण्यात सध्या कोरडे वातावरण असून कोकणात अद्याप काळे गढ दाटून आल्याचे दिसत आहेत.

कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने काही निवडक ठिकाणी तुरळक पाऊस पडू शकतो. त्यामुळे वातारणातील तापमानात बदल होऊन पुढील दोन दिवसांत राज्यात पुन्हा एकदा गुलाबी थंडीला सुरुवात होईल. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस बरसला असला तरी उत्तरार्धात पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दिवाळीमध्ये दरवर्षी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. मात्र यंदा दिवाळी आधी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा चिंतेत होता. राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. पाऊस पुढे असाच सुरू राहिला असता तर शेतीचे आणखी नुकसान झाले असते. मात्र आता पावसाने माघार घेतली असून पुन्हा एकदा गुलाबी थंडी येणार असल्याने बळीराजाही सुखावला आहे.

Weather Update
Pune Crime: दिवाळीच्या खरेदीसाठी गेल्या पण बोनस झाला चोरी; पुण्यातील मार्केटमध्ये चोरट्यांचा प्रताप

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com