प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या सहा बस चालकांवर निलंबनाची कारवाई, Saam Tv बातमीचा इम्पॅक्ट

साम टीव्हीने दिलेल्या वृत्ताची दखल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतली आहे.
Bus risky traveling in wardha
Bus risky traveling in wardhasaam Tv
Published On

चेतन व्यास

वर्धा : आर्वी तालुक्याच्या वर्धमनेरी येथे रविवारी पुलावरून पुराच्या पाण्याचा प्रवाह सुरु असतानाही प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत बसची वाहतूक केली जातं होती. याबाबत साम टीव्हीने वृत्त (Saam Tv News) प्रकाशित करताच धोकादायक प्रवास घडवीणाऱ्या सहा बस चालकांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) निलंबनाची कारवाई केली आहे. वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी परिवहन महामंडळाला नोटीस बजावत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यात आलेल्या चालकांमध्ये आर्वी आगाराचे पाच चालक तर एक तळेगाव आगाराच्या चालकाचा समावेश आहे. ( MSRTC Suspension order for six bus drivers )

Bus risky traveling in wardha
केंद्रीय नेते मुंबई निवडणुकीसाठी प्रचार करतात, भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये धमक नाही, दानवेंचा हल्लाबोल

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या होत्या. मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आलं होतं. आर्वी तालुक्याच्या वर्धमनेरी येथील नाल्याला पूर आल्याने तेथील पुलावरून पाणी वाहत असल्याने आर्वी वर्धमनेरी मार्गांवरील वाहतूक बंद झाली होती.पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू असतानाही बस चालकांनी पाण्यातून बसची वाहतुक केली. याबाबत साम टीव्हीने वृत्त दिलं होतं.

Bus risky traveling in wardha
Nagpur News : नागपूरमध्ये तिरंग्याचा अपमान ? तलावाच्या काठावर 4 हजार राष्ट्रध्वज फेकले

साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या चालकांवर जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी कारवाईचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाच्या विभागीय नियंत्रकांना नोटीस पाठवून कारवाईचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांचे आदेश मिळताच विभागीय नियंत्रकांनी सहा चालकांना निलंबित केले आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com