Maharashtra Rain News : वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; कोल्हापुरात कारवर कोसळलं भलं मोठं झाड, कारचा झाला चुराडा

Rain Alert : कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. आज दुपारी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
Maharashtra Rain News
Maharashtra Rain NewsSaam Digital

कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. आज दुपारी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे.जोतिबा डोंगरावर देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालाय. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले तर रस्त्यावर झाडं कोसळली आहेत. जोतिबा रोडवरील हॉटेल साम्राज्य इथं चारचाकीवर भलमोठं झाड कोसळलं असून कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारमधील दोघं दोघजण जखमी झाले आहेत.ल दरम्यान हवामान विभागाने उद्या २१ मे रोजीही दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिलाय. करमाड, शेकटा आणि करंजगाव शिवारात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तर बिडकिन शिवारात झालेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पपई च्या बागाना बसला असून हे पीके आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय.

शिवाय उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटाका बसलाय. दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय.

Maharashtra Rain News
Latur Water Scarcity : लातूर जिल्ह्यातील ८ पैकी ४ मध्यम प्रकल्प कोरडे; शेती सिंचनासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

वाशिममध्ये विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचं नुकसान

वाशिम शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झालंय. हवामान विभागाने आज वाशिम जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला होता. त्यानुसार आज पाऊस झाला. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल ओट्याच्या खाली रस्त्यावर टाकलेला असल्यामुळे हा माल भिजला. यावेळी शेतमाल झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाड्याचं पाहायला मिळालं. याआधी सुद्धा अनेकदा असेच प्रकार घडलेले असूनही कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र या बाबीकडे लक्ष देत नसल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Maharashtra Rain News
Amalner crime : शेत रस्त्यावरून वाद; मारहाणीत एकाचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com