
विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो ची रणनीती आखलीय का अशी चर्चा अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर सुरू झालीय. मुंबई, ठाणे आणि पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चाचपणीचे आदेशच महाराष्ट्र दौऱ्यात अमित शाहांनी दिल्याची माहितीच सुत्रांनी दिलीय... काय आहेत अमित शाहांचे आदेश ? पाहूयात
मुंबई महापालिकेसाठी शिंदेंकडून 107 जागांचा प्रस्ताव
अमित शाहांकडून मतांचं गणित मांडत प्रस्ताव फेटाळला
2017 मध्ये शिवसेना-भाजप वेगळे लढल्यानंतर भाजप- 82 तर शिवसेनेच्या 84 जागा
मुंबईत भाजपचे 15 तर शिंदे गटाचे 8 आमदार
पक्षफुटीनंतर शिंदे गटाची घटल्याचा शाहांचा दावा
युतीत लढण्यापेक्षा स्वबळाच्या चाचपणीचे आदेश
तब्बल तीन वर्ष मुंबई महापालिकेवर प्रशासक राज आहे.. सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यात महापालिका निवडणूका घेण्याचे आदेश दिले... त्यानंतर भाजपने मुंबई जिंकण्यासाठी रणनीती आखलीय... तर आता अमित शहांनी महाराष्ट्र दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना स्वबळाच्या चाचपणीचे आदेश दिलेत... मात्र त्यापुर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिका निवडणूका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
खरंतर विधानसभा निवडणूकीत महायुतीने 236 जागा जिंकल्या... यामध्ये भाजपच्या 135 जागा आहेत.. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं आपला प्रभाव कायम राखण्यासाठी शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची त्यांच्याच बालेकिल्ल्यात कोंडी करण्याची रणनीती आखलीय.
मुंबई आणि ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता
मुंबई आणि ठाणे जिंकण्यासाठी भाजपची रणनीती
पुणे आणि पिंपरी चिंचवड अजित पवारांचा बालेकिल्ला
दोन्ही महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी भाजपची चाचपणी
2017 मध्ये थोडक्यात हुकलेली संधी पुन्हा मिळवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी भाजपनं एकला चलोचा नारा दिलाय खरा... त्यामुळे विधानसभेला मजबूतीनं उभी राहिलेली महायुती स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर मजबूरीकडे झुकेल का? याबरोबरच भाजप स्वबळावर विजयी घोडदौड कायम राखणार की नवी रणनीती भाजपला मारक ठरणार? हे येणारा काळच सांगेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.