>>भूषण शिंदे
Aaditya Thackeray On CM Eknath Shinde's Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावर टीका केली आहे. आता कलयुग आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले. सध्या कलयुक सुरू आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. ठीक आहे, पण आम्ही नक्कीच पुन्हा राम राज्य या महाराष्ट्रात आणू. हाच विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आमचं तर ब्रिदवाक्यच आहे की रघुकुल रित सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जाये", असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महंत परमाहंस करणार मुख्यमंत्र्यांचे स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे उद्धव ठाकरे यांना विरोध करणारे महंत परमाहंस आचार्य मुख्यमंत्र्यांचं स्वागत करणार आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्यामुळे हिंदूत्त्वाच्या विचारापासून दूर गेले असे म्हणत महंत परमाहंस यांनी उद्धव ठाकरेंचा विरोध केला होता.
आता तेच महंत शिंदेचं स्वागत करणार आहे. यासाठी जय्यत तायरी सुरू करण्यात आली आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत जगतगुरु परमाहंस आचार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करणार आहेत. यापूर्वी महंत परमाहंस आचार्य यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विरोध केला होता. (Maharashtra Politics)
शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या अयोध्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘राजतिलक की करो तैयारी आ रहे है भगवाधारी’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले असून रस्त्याच्या दुतर्फा शिवसेनेचे झेंडे फडकताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा भव्यदिव्य करण्यासाठी शिवसेनेची एक टीम आधीच अयोध्येत दाखल झाली आहे. (Latest Marathi News)
अयोध्येत भव्य रॅल काढण्यात येणार
शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री अयोध्येत दाखल झाल्यानतंर भव्य रॅल काढण्यात येणार आहे. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. लक्ष्मण किल्ला येथे संत महंत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतील. दरम्यन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योगी आदिनाथ यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या घरी जेवण देखील करणार आहेत अशी माहिती म्हस्के यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.