Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Sunil Tatkare Comment On NCP Merge: ठाकरे बंधूनंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा रंगल्यात. मात्र राष्ट्रवादीचं विलिनीकरण भाजपच्या अटींवर होण्याचे संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दिलेत.पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
sunil tatkare and ajit pawar
Sunil Tatkare Comment On NCP Merge
Published On

ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेने जोर धरलाय. त्यातच आता सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपशी बोलावं लागेल, असं विधान करत खळबळ उडवून दिलीय. तटकरेंच्या विधानानंतर विरोधकांच्या हाती आयतंच कोलित मिळालंय. तर बैलगाडीचं उदाहरण देत काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार टोला लगावलाय. तर सुप्रिया सुळेंनीही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी भाजपची मान्यता घेण्याचा प्रस्ताव अमान्य केलाय.

खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर सगळे मतभेद विसरुन एकत्र येणं चांगलंच आहे, असं म्हणत पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक संकेत दिले होते.. त्यानंतर आता तटकरेंनीही विलीनीकरणाची चर्चा छेडल्याने आगामी काळात ठाकरे बंधूप्रमाणे पवार काका पुतण्या एकत्र येणार की आपले पक्ष कायम ठेवून लढणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com