Shinde-Thackeray Group Clash: शिंदे- ठाकरेंच्या सेना रस्त्यावर भिडल्या; शिवसेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक राडा

Shinde-Thackeray Group Clash: हिंदीसक्तीचा निर्णय रद्द झाल्याने ठाकरे सेना आणि मनसेनं जल्लोष केला. मात्र एकीकडे जल्लोष सुरु असताना शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार राडा झालाय. मात्र हा राडा नेमका का झालाय? पाहूयात.
Shinde-Thackeray Group Clash
Shinde-Thackeray Group Clashsaamtv
Published On

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे आणि ठाकरे सेना 5 जुलैला रस्त्यावर उतरणार होत्या. त्याआधीच राज्य सरकारनं त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द करण्याची घोषणा केली. हा निर्णय मागे घेतल्यानंतर मनसे आणि ठाकरे सेनेकडून मराठीचा जल्लोष सुरु झाला. मात्र त्याचवेळी मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे सेनेत वादाची ठिगणी पडली. दोन्ही सेना आमनेसामने आलाय आणि प्रकरण शिवीगाळ, हाणामारीपर्यंत पोहचलं.

दोन्ही सेना का भिडल्या?

शाखाप्रमुखांमध्ये एकमेकांच्या पक्षावर भाष्य करण्यावरून वाद

ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्याकडून छत्री वाटपाचा कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह

शिंदे सेनेच्या शाखाप्रमुखाची लाईव्ह दरम्यान टीका

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ, हाणामारी

या निमित्ताने सोशल मिडीयाचं आभासी जग कलहाला कारणीभूत ठरत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. अगदी शुल्लक कारणावरुन सुरु झालेला हा वाद माफी मागितल्यानंतर मिटला जरी असला तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये मात्र ठाकरे आणि शिंदेसेनेमध्ये जुंपणार हे निश्चित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com