Maharashtra Politics: 'वर्षा' बंगल्यात रेडा, अंधश्रद्धेचा वेढा, शिंदे गट म्हणतं राऊतांवर गुन्हा दाखल करा

Varsha Bungalow: वर्षा बंगल्यातल्या जादू-टोण्याच्या आरोप-प्रत्यारोपावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच वाद फेटलाय.
Maharashtra Politics
Varsha Bungalowsaamtv
Published On

वर्षा बंगल्यातल्या जादू-टोण्याचा वाद काही शमायला तयार नाही. संजय राऊतांनी मंतरलेली शिंगं पुरल्याच्या दावा केल्यानंतर आता फडणवीसांना वर्षावर जाण्याचा मुहूर्तच जाहीर केलाय. तर शिंदे गटानं राऊतांवर कारवाईचा इशारा दिलाय. नेमकं काय चाललंय वर्षावरून राजकारण त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

शपथविधीला 2 महिने झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. या मुद्यावरून वर्षावर जादूटोणा केल्याची चर्चा रंगलीय. तर संजय राऊतांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीला बळी दिलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगं पुरल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली. एवढंच नाही तर जादूटोण्याच्या चर्चेमुळे वर्षा बंगला पाडला जाणार असल्याचाही दावा त्यांनी केला.

Maharashtra Politics
Devendra Fadnavis : "सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात.." CM देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

मात्र हा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावला. त्यांनी मुलीच्या १० वीच्या परीक्षेचं कारण दिलं. मात्र त्याचीही संजय राऊतांनी खिल्ली उडवली. राऊतांच्या या द्यावचा भाजपनं खरपूस समाचार घेतला. तर शिंदे गटानं थेट राऊतांवर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाबत पुन्हा अंधश्रद्धेच्या वावड्या उठवल्या जात आहेत.. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगला कधी सोडणार आणि मुलीच्या परीक्षेनंतर तरी मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर राहायला जाणार की नाही?याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com