Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी कुणाची? अजित पवार गटाकडून हालचाली सुरू; नंदुरबार जिल्ह्यातून पाठवली ५००० प्रतिज्ञापत्रे

Maharashtra Political Crisis: शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर आता खरा पक्ष कोणाचा असा प्रश्न उभा राहिला आहे.
NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar
NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar saam tv
Published On

सागर निकवाडे, प्रतिनिधी...

Nandurbar News: शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडल्यानंतर आता खरा पक्ष कोणाचा असा प्रश्न उभा राहिला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचे सांगत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यामुळे राष्ट्रवादीतही अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडल्याचे पाहायला मिळत असून दोन्ही गटाकडून पक्षावर दावा ठोकला जात आहे. आता अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्रे देण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar
Maharashtra Gujarat Border: महाराष्ट्रातील गावांवर गुजरातचा दावा; दीड किमी घुसखोरी केल्याचा स्थानिकांचा आरोप

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीतून (NCP) अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदारांना घेऊन बाहेर पडले नंतर खरी राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे अजित पवार गटाकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र देण्यात येत असून, नंदुरबार जिल्ह्यातून देखील पाच हजार प्रतिज्ञापत्र आणि 100 स्टॅम्प पेपरवर नोटरी करून पक्ष कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडून पक्ष आपला असल्याचा दावा करत यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र तयार करून पाठवण्यात आले आहेत. आणखी काही प्रमाणावर प्रतिज्ञापत्र पक्ष कार्यालयाला पाठवलं जाणार असून राष्ट्रवादी पक्ष हा खरा आमच्या असा देखील विश्वास अजित पवार गटाकडून करण्यात येत आहे.

NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar
Maharashtra Assembly Winter Session 2023: विधिमंडळाचे पुढील अधिवेशन नागपुरात, तारीख जाहीर

शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा...

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारही (Sharad Pawar) चांगलेच आक्रमक झाले आहेत. नाशिकच्या (Nashik) सभेनंतर त्यांचा थांबलेला महाराष्ट्र दौरा पुन्हा एकदा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या १० ऑगस्टपासून हा दौरा सुरू होणार असून आगामी काळात शरद पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com