Raj Thackeray News: 'तो एक अपघात, त्याचं राजकारण...' खारघर दुर्घटनेवर राज ठाकरेंची स्पष्ट प्रतिक्रिया; CM शिंदेंच्या भेटीबद्दल केला महत्वाचा खुलासा
Mumbai News: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल अचानक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. या घडामोडी सुरू असतानाच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदेंची भेट घेतली.
बीडीडी चाळीच्या समस्या, अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणेबाबत, नवी मुंबईतील सिडको सोडतधारकांचं शिष्टमंडळ आठ हजार मराठी कुटुंबाच्या घरांसाठी राज ठाकरेसोबत मुख्यमंत्र्यांना भेटले. यावेळी राज ठाकरेंसोबत मनसेचे आमदार राजू पाटील, संदीप देशपांडे, गजानन काळे हे नेतेही उपस्थित होते.
काय म्हणाले राज ठाकरे?
या भेटीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या भेटीबद्दल खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांशी वरळी बिडीडी पुर्नविकास प्रकल्पा संदर्भात चर्चा झाल्याचा खुलासा केला. या संदर्भात लवकरच बैठक लावली जाईल आणि बिडीडी वासियांचे प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासनही त्यांंनी यावेळी दिले.
"वरळीतील बीडीडी चाळीतील नागरिकांच्या पूनर्विकाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. तिथे नक्की काय होणार, याची माहिती रहिवाशांना नाही. सरकारने ती द्यावी, अशी मागणी केली आहे. घरं कशी असणार?, शाळा होणार का?, स्पेस किती असेल?" याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितंल.
खारघर दुर्घटनेचे राजकारण नको...
यावेळी खारघर दुर्घटनेबद्दल बोलताना "ही घटना दुर्देवी असून कार्यक्रमाची वेळ सकाळची घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तो एक अपघात होता. त्याचं राजकारण करु नये. अपघाताचं काय राजकारण करायचं? तसं म्हटलं तर मग कोरोनामध्ये एवढी माणसं गेली. त्या प्रकरणातसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल," असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.