Maharashtra Politics: ..तर जयंत पाटील यांनीही आमच्यासोबत शपथ घेतली असती, हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: जयंत पाटील एका घटनेमुळे बचावले, नाही तर त्यांनी सुद्धा आमच्या सोबत शपथ घेतली असती. असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील राष्ट्रवादीमधील आणि विशेषता पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते. तर शरद पवार यांच्या मर्जीतले नेते अशी या दोघांची राजकारणातओळख होती. मात्र, जयंत पाटील एका घटनेमुळे बचावले, नाही तर त्यांनी सुद्धा आमच्या सोबत शपथ घेतली असती. असा गौप्यस्फोट वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचा शरद पवारगट आणि अजित पवारगट पुन्हा चर्चेत आले आहेत. एकेकाळचे सोबती आणि शरद पवारांच्या दोन्ही बाजूला हक्काने बसणारे जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात असं नेमकं काय घडले आहे ? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील यांचा अनेक वर्ष सन्मान ठेवत, आपल्या पक्षामध्ये योग्य स्थान ही दिले आहे. आता राष्ट्रवादीत फूट पडली आहे आणि शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील तर अजित पवार यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांनी जाणं पसंत केलं. सुरुवातीला एकमेकांवर टीका टिपणी करण्याचं या दोन्ही दिग्गज नेत्यांनी टाळलं होतं. मात्र आता थेट नाव घेऊन एकमेकाची गुपितं बाहेर काढण्याची भाषा करत आहेत.

Maharashtra Politics
Raju Shetty Shetkari Sanghatana: 'चहा प्यायला पदरच्या ऊसाची साखर मिळेना'...शेतकरी महिलेने राजू शेट्टी यांच्यासमोर मांडली व्यथा

हसन मुश्रीफ आणि जयंत पाटील या दोघांचीही ईडीने चौकशी लावलेली आहे. ईडी चौकशी सुरू झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांच्या बरोबरीने भाजप सोबत जाणे पसंत केलं. जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची सध्या ईडी चौकशी सुरू आहे.गलीतल्या एका इलेक्ट्रिक व्यवसायात असणाऱ्या व्यापाऱ्याने साधारण दोन हजार कोटी रुपयांचा जीएसटी चुकवलेला आहे. या व्यापाऱ्यांचे आणि जयंत पाटलांचे अंतर्गत संबंध असल्याच्या चर्चा आहेत. यापूर्वी जयंत पाटलांनी या व्यापाऱ्याला आपण ओळखत नसल्याचे सांगितले आहे. मात्र तरीही या संदर्भात राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

शरद पवार यांच्या जवळ राहून अजित पवारांपेक्षाही मोठे स्थान मिळवण्याचा जयंत पाटलांचा नेहमीच प्रयत्न होते त्यातून जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अंतर्गत मतभेद होते . तर अजित पवार यांच्या आधी भाजपसोबत जाण्याची जयंत पाटील यांची इच्छा होती मात्र, परिस्थितीनुसार त्यांनी हे निर्णय बदलले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कदाचित हसन मुश्रीफ यांनी याचाच आधार घेत जयंत पाटील यांच्या संदर्भात हा गौप्यस्फोट केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता जयंत पाटील हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला काय उत्तर देतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Politics
Farmer Bullock Cart Yatra: आरक्षणासाठी शेतकरीही उतरले आंदोलनात; पंढरपूर ते अंतरवाली सराटी दरम्यान बैलगाडी आरक्षण यात्रा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com