Loksabha Election 2024: शिरुरचा सामना ठरला! आढळराव पाटलांचा २६ मार्चला अजित पवार गटात प्रवेश; अमोल कोल्हेंना आव्हान देणार

Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP: शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. २६ मार्चला आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.
Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:
Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:Saamtv

Shirur Loksabha Constituency:

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला शिरुर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला असून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. २६ मार्चला आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. शिरुरमध्ये बदला घेण्यासाठीच लढणार असून महायुतीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, असा विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शिरुर लोकसभेच्या उमेदवारीवरुन महायुतीमध्ये जोर- बैठका सुरू होत्या. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरमधून लढण्यास इच्छुक होते. मात्र शिरुरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे असल्याने आढळराव पाटील यांना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.

अखेर आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून २६ मार्च रोजी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार अमोल कोल्हेंना पाडणारचं, असे थेट आव्हान दिल्याने ही निवडणुक राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे शिरुरमध्ये हायहोल्टेज सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:
Pankaja Munde : माझ्यावर टीका करण्यासाठी जातीचं अस्त्र उगारलं जातंय; पंकजा मुंडेंचं विरोधकांवर टीकास्त्र

अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया!

दरम्यान, आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार अमोल कोल्हे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. "शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत आहे. आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय ताकदवान नेत्यांना उमेदवार आयत करावं लागणं हेच माझे यश आहे," असे ते म्हणालेत. (Latest Marathi News)

Shivajirao Aadhalrao Patil Joining NCP:
Chhatrapati Sambhaji Nagar : वाळुज एमआयडीसी परिसरात गुन्हेगारांचा सुळसुळाट; एका तरुणाची निर्घृण हत्या तर दुसरा गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com