Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Tv

Maharashtra Politics : अजित पवारांनी माफी मागावी, आत्मक्लेश करावा - महसूलमंत्री विखे पाटील

यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा घणाघात देखील विखे पाटलांनी केला आहे.
Published on

सचिन बनसोडे

अहमदनगर - राज्याचे महसुलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सपत्निक साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल अजित पावर यांनी माफी मागावी आणि आत्मक्लेष करावा अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Maharashtra Politics
Delhi Fire : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना; नर्सिंग होमला भीषण आग

विरोधकांची मानसिक कोंडी झाली असून परस्पर विरोधी आणि बेताल विधान ते करताहेत. हिंदु धर्म, स्वधर्म यासाठी छ. संभाजी महाराजांनी बलिदान दिलंय. अजित पवारांना हे कळायला हव की ते धर्मवीर आहेत. अजीत पवार यांनी वक्त्याबद्दल माफी मागावी आणि आत्मक्लेष करावा. मधल्या काळात शरद पवार यांनी देखील आक्षपार्ह विधान केले.

Maharashtra Politics
LPG Price Hike : वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, नवीन दर तपासा

यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचा घणाघात देखील विखे पाटलांनी केला आहे. राहुल गांधींचे वक्तव्य गंभीरतेने घेण्याची गरज नाही. मागिल लोकसभेला नीचांकी जागा काँग्रेसला मिळाल्या. विरोधी पक्षनेते पदा एवढ्या देखील जागा मिळाल्या नाहीत. पुढील निवडणूकीत त्याही मिळणार नाहीत.

वायफळ खर्च करण्यासाठीची भाजपची भूमिका नाही असा टोला विखे पाटलांनी राहुल गांधी यांच्या बदनामी साठी भाजपने पैसा खर्च केल्याच्या वक्तव्यावर लागवला आहे. काळाच्या ओघात घटक पक्षामधील एकोपा राहीला नाही. आघाडी देखील राहील की नाही याबाबत शंका असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com