Maharashtra Politics 2024 : आव्हाडांच्या मदतीला धावले भुजबळ; मनुस्मृतीवरून भुजबऴांनी भाजपलाच सुनावलं

Maharashtra Politics 2024 Update : महाडंमध्ये मनुस्मृती दहनाचं आंदोलन अंगलट आल्यामुळे अडचणीत आलेल्या आव्हाडांच्या मदतीला भुजबळ धावून आले आहेत. एवढच नव्हे तर भुजबळांनी या मुद्यावरून भाजपला सुनावलंय.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

महाडंमध्ये मनुस्मृती दहनाचं आंदोलन अंगलट आल्यामुळे अडचणीत आलेल्या आव्हाडांच्या मदतीला भुजबळ धावून आले आहेत. एवढच नव्हे तर भुजबळांनी या मुद्यावरून भाजपला सुनावलंय आणि आंदोलनाची हवाच काढण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट.

जितेंद्र आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन करण्याचं केलेलं आंदोलन अंगलट आलं आणि महायुतीला आयतं कोलित मिळालं. जितेंद्र आव्हाडांकडून घडलेल्या कृत्याचा निषेध करण्यासाठी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटानं ठिकठिकाणी राज्यभर निषेध नोंदवत आंदोलनं केली. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आव्हाडांवर जोरदार टीका केली.

राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक समाविष्ट करण्यात येणार असल्याचा प्रस्ताव होता. त्यापार्श्वभुमीवर जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये मनुस्मृती दहन केलं. मात्र मनुस्मृती दहनावेळी जितेंद्र आव्हाडांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं आणि महायुतीनं आव्हाडांना लक्ष्य केलं. अजित पवार गटाच्या मुश्रीफांनी तर आव्हाडांना अद्दल घडवा असं विधान केलं. मात्र ज्येष्ठ मंत्री छगन भुजबऴ आव्हाडांच्या मदतीला धावले.

Maharashtra Politics 2024
Loksabha Election: 400 पार आणि मनुस्मृतीवरुन भुजबळ हैराण; छगन भुजबळांनी टोचले भाजपचे कान

भुजबळांनी आव्हाडांना क्लिन चीट तर दिलीच. मात्र आव्हाडांच्या नावाखाली मनुस्मृतीवरचा फोकस हटायला नको अशा शब्दात भाजपलाही सुनावलं. त्यामुळे अडचणीत आलेल्या जितेंद्र आव्हाडांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय. मनुस्मृतीवरून महायुतीला अडचणीत आणण्यासाठी आव्हाडांनी महाडचं आंदोलन केलं मात्र त्यांच्याच अंगलट आलं. आव्हाडांना घेरण्यासाठी भाजपसह मित्रपक्षांनी राज्यभर आंदोलनं करत आक्रमक पवित्रा घेतला. मात्र भुजबळ आव्हाडांच्या मदतीला धावल्यामुळे महायुतीतले मतभेदच चव्हाट्यावर आले.

Maharashtra Politics 2024
Rahul Gandhi : PM नरेंद्र मोदी मौनव्रतात, आता चर्चा अशक्य; ४५ तासांच्या ध्यानधारणेवरून राहुल गांधींनी काढला चिमटा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com