

विनोद जिरे, बीड
Beed Political News: राज्यामध्ये सध्या राजकीय (Maharashtra Politics) उलथापालथ सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेमध्ये (NCP) फूट पडल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी (Ajit Pawar) बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. नेमंक कोणासोबत जायचे अजित पवार की शरद पवार असा प्रश्न त्यांना पडला आहे. अजित पवारांच्या गटामध्ये एकापाठोपाठ एक आमदार सहभागी होत आहेत. अशामध्ये बीडचे आणखी एक आमदाराने शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत अजित पवारांच्या गटामध्ये सहभागी होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांपुढे शरद पवारांकडे जाऊ की अजित पवारांकडे जाऊ? असा पेच उभा ठाकला आहे. अशाच पेचाचा सामना करणाऱ्या बीडच्या आष्टी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र अखेर त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी अजित पवारांच्या बैठकीला जात आहे', अशी माहिती त्यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली.
बीड जिल्ह्यातील आमदार धनंजय मुंडे, प्रकाश सोळुंके यांनी आधीच अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बीड जिल्ह्यातले दोन आमदार अजित पवार गटात गेले. पण इतर दोन आमदार म्हणजे बाळासाहेब अजबे आणि संदीप क्षीरसागर यांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे ते नेमंक कोणासोबत जाणार अशी जिल्ह्यामध्ये चर्चा सुरु होती. अशामध्ये आता बाळासाहेब अजबे यांनी अजित पवारांसोबत जाणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यापैकी कोणाला जास्त आमदारांचे समर्थन आहे? याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.