Rajesh Tope: राजेश टोपेंना शिंदे गट मोठा धक्का देण्याच्या तयारीत

राजेश टोपेंच्या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
Rajesh Tope
Rajesh TopeSaam Tv

जालना:- राजेश टोपेंच्या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेने (Shivsena) पाठोपाठ आता शिंदे गटाने राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या मतदार संघाकडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांचं एकहाती वर्चस्व असलेल्या जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटांनं कंबर कसली आहे.

हे देखील पाहा -

आज घनसावंगी तालुक्यातील देवीदहेगाव येथे समृद्धी गणेश फेस्टिव्हल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शिंदे गटाचे उपनेते मा. राज्यमंत्रीअर्जुन खोतकर यांनी चक्क कार्यक्रमा दरम्यान समृद्धी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन सतिष घाटगे यांना शिंदे गटात येण्याचं जाहीर आमंत्रण दिलंय.त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उद्योजक सतिष घाटगे हे राजेश टोपे यांच्यासमोर आव्हान उभं करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rajesh Tope
Delhi: आझाद मार्केटमध्ये 4 मजली इमारत कोसळली, 3 कामगारांचा मृत्यू

दरम्यान या ऑफरवर विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया उद्योजक सतिष घाटगे यांनी दिली आहे. त्यामुळे साखर कारखान्याच्या माध्यमातून मतदार संघावर पकड निर्माण केलेल्या राजेश टोपे यांना प्रतिस्पर्धी म्हणून शिंदे गटाकडून तोडीस तोड अशा समृद्धी शुगर इंडस्ट्रीजचे चेअरमन यांनाच आमंत्रण देण्यात आल्याने येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत टोपे विरुद्ध घाडगे पाटील असा सामना रंगण्याची चिन्ह वर्तविली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com