Sanjay Raut News: 'परदेशातून प्रवचने देऊ नका, जनता रस्त्यावर फिरून देणार नाही..' संजय राऊतांनी नार्वेकरांना ठणकावले

Sanjay Raut On Rahul Narvekar: ते स्वतः अनेक पक्षांतून आल्याने पक्षांतर करणे त्यांचा छंद आहे," असेही राऊत यावेळी म्हणाले...
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSaam Tv
Published On

Sanjay Raut On Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. ज्यामध्ये काँग्रेसने कर्नाटकात (Karnataka Election) भाजपचा सुपडा साफ केला आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे जात 136 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे

निवडणूकीत विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला (BJP) कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. या विजयानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्येही (Mahavikas Aaghadi) उत्साह संचारला असून "कर्नाटक झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे..." म्हणत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसने (Congress) ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. निवडणूकीसाठी संपूर्ण भाजपची यंत्रणा कामाला लावूनही पराभव पत्करावा लागला. त्यामुळे हा भाजप आणि नरेंद्र मोदींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालावरुनच संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत...

"कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या धार्मिक राजकारणाला नाकारले असून बजरंग बलीच्या घोषणा देणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला," अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. तसेच कर्नाटक झाकी है, पुरा देश अभी बाकी है, असे म्हणत राऊतांनी भाजपला थेट ईशारा दिला आहे.

राहुल नार्वेंंकरांवरही टीका...

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील (Maharashtra Politics) सत्ता संघर्षाच्या निकालावरुन राहुल नार्वेंकर हल्लाबोल केला आहे. "राहुल नार्वेकर शिवसेनेच्या १६ आमदारांना वाचवण्यासाठी लंडनमधून भाषणं देत आहेत, ते स्वतः अनेक पक्षांतून आल्याने पक्षांतर करणे त्यांचा छंद आहे," असे ते म्हणाले.

तसेच "कायद्याचं पालन करा हे सांगतोय. पक्षांतराला उत्तेजन देऊन लोकशाहीची हत्या करणं हे चालू देणार नाही. भूलथापा बंद करा. तुम्ही वकील असाल तर न्यायालयाचा निर्णय वाचा, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com