रोहिदास गाडगे
Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकार राहणार की कोसळणार? राज्याचे मुख्यमंत्री कोण असणार अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. सुप्रीम कोर्टात आज सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Political News)
राज्यातल्या सत्ता संघर्षाचा निकाल काही वेळातच समोर येणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड या निकालाचे वाचन करणार आहेत. नवीन पिढीला अपेक्षित निर्णय देतील अशी अपेक्षा आहे. देशातील राजकारण्यांना पाहिजे तसा निर्णय असू शकतो त्यामुळे हुकुमशाहीला छेद देणारा निकाल ठरणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांनी व्यक्त केलंय.
भाजपाला भविष्य लवकर कळतंय
भाजपाला भविष्य लवकर कळतय असं म्हणत सत्तासंघर्षात मोहितेपाटलांनी भाजपाला चिमटा काढलाय. सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह १६ आमदार अपात्र होऊन बाजूला जातील आणि राहिलेल्यांना भाजपासोबत मंत्रीपदाची संधी मिळून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहितेपाटीलांनी व्यक्त केलंय. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर्स
एकिकडे दिलीप मोहितेपाटील यांनी असं वक्तव्य केलं आहे तर दुसरीकडे पुण्यातील वारजे परिसरात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी पुण्यात अजित पवारांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या फ्लेक्सवर अजित पवार यांच्या विविध भावमुद्रा असलेली छायाचित्रे आहेत. तसेच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह घड्याळ आणि विकासाची गगनभरारी, हीच अजितदादांची कामगिरी असा आशय यावर लिहलेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.