Maharashtra Political Crisis Live: उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिला राजीनामा; राजभवनात शिवसैनिकांची घोषणाबाजी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जाणून घेऊयात क्षणोक्षणीच्या ताज्या अपडेट्स
Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray resigns
Maharashtra Political Crisis Uddhav Thackeray resignsSaam TV

राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनावर

उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही सोबत होते. राजभवनावर जाऊन ते आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार आहेत.

येत्या १ तारखेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेण्याची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली असून येत्या दोन दिवसात सत्ता स्थापन करण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली असून येत्या 1 तारीखलाच ते शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का! बहुमत चाचणी पुढे ढकलण्यास कोर्टाचा नकार

मुंबई : संपुर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागून असलेला निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार की नाही याबाबतचा आता मोठा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असून ठाकरे सरकारचे भवितव्य काय ते उद्याच कळणार आहे. कारण मविआ सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी कोर्टाने फेटाळली आहे.

बहुमत चाचणीची इतकी घाई का करण्यात आली? जर आमदार अपात्र ठरले तर काय करता येईल?, वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद

सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी हे युक्तीवाद करत आहेत. राज्यपालांनी इतक्या घाईने बहुमत चाचणी सिद्ध करण्यास सांगितले. आमदारांच्या अपात्रतेवर सुप्रीम कोर्टातच ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ११ जुलै रोजी हे आमदार अपात्र घोषित केल्यानंतर काय होईल? , असा युक्तीवाद सिंघवी यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले

गुवाहाटी विमानतळ परिसराला छावणीचे स्वरूप, थोड्याच वेळात बंडखोर आमदार पोहचणार गुवाहाटी विमानतळावर

एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार थोड्याच वेळात गोवा येथे रवाना होणार

आम्हाला कोर्टात न्याय मिळेल, निकालानंतर पुढील दिशा ठरवू- विनायक राऊत

मुंबईत मातोश्रीवरील बैठक संपल्यानंतर आता सर्वच प्रमुख नेते बाहेर पडले आहेत. बैठकीनंतर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कोर्टात न्याय मिळेल. निकलानंतर पुढील दिशा ठरवू, असे ते म्हणाले.

शिवसैनिकांकडून मातोश्रीबाहेर घोषणाबाजी, बंडखोरांचा निषेध नोंदवण्यासाठी एकवटले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी नागपूरमध्ये शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन

एकनाथ शिंदे गट उद्या मुंबई विमानतळावर पोहोचणार, विमानतळावरून हेलिकॉप्टरने राजभवन येथे जाणार

भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपली; आशिष शेलार, चंद्रकांत पाटील भाजप प्रदेश कार्यालयाकडे निघाले

बहुमत चाचणीदरम्यान आसनव्यवस्था बदलू नये; भाजपची मागणी

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभा उपाध्यक्ष आणि प्रधान सचिवांची विधानभवनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी बहुमत चाचणी दरम्यान आसनव्यवस्था बदलू नये अशी आपण मागणी केली असल्याचं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं.

आम्हाला बहुमत चाचणीची चिंता नाही, एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून व्यक्त केला विश्वास

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवतील- दीपक केसरकर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण असतील ते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ठरवतील, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी विनंती आम्ही कालपर्यंत केली, पण आता उशीर झाला आहे, असे केसरकर म्हणाले.

पूरग्रस्तांना मदत केल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी एकनाथ शिंदेंचे मानले आभार

एकनाथ शिंदे गटातील आमदार पणजीला रवाना होण्यापूर्वी गुवाहाटीत कामाख्य मंदिरात दर्शनासाठी गेले

बंडखोर आमदारांचा गट पणजीला निघण्यापूर्वी कामाख्य मंदिराकडे निघाले आहेत. बहुमत चाचणीआधी बंडखोर आमदार दर्शन घेणार आहेत. या आमदारांसोबत एकनाथ शिंदे देखील आहेत.

सुप्रीम कोर्टातील सुनावणीकडे महाविकास आघाडीचे लक्ष

सिल्व्हर ओक आणि मेघदूत येथे झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीची भूमिका

सुप्रीम कोर्टात आज संध्याकाळी ५ वाजता होणार सुनावणी

कोर्टातील सुनावणीनंतर महाविकास आघाडी आपली भूमिका घेणार

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला एकनाथ शिंदे आणि आमदार धावले, ५१ लाखांची मदत

मातोश्रीवर शिवसेना नेत्यांनी बोलावली बैठक, प्रमुख नेते पोहोचले, पुढील रणनीती आखण्यासाठी होणार बैठक

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांनी सकाळी बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. त्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेत्यांनी तातडीने मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे. रणनीती आखण्यासाठी ही बैठक होत आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते बैठकीसाठी मातोश्रीवर जात आहेत.

शिवसेनेच्या याचिकेवर संध्याकाळी ५ वाजता सुनावणी

राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला) बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्याचं राजकारण आता निर्णायक स्थितीत आलं आहे. शिवसेनेने (Shivsena) राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती, याच याचिकेवर आता सुप्रीम कोर्टाची सुनावणी आज (बुधवारी) संध्याकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे. आजच दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवसेनेकडून वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे.

बहुमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात

मुंबई: राज्यपालांच्या पत्राला शिवसेनेने (ShivSena) आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. आमदारांच्या कारवाईवर दोन आठवड्यांचा वेळ दिला आणि बहुमत चाचणीला २४ तासांचा वेळ दिला, यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ही याचिका जेव्हा लिस्टेड होणार तेव्हा ही याचिका घेतली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यपालांच्या पत्राला महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात देणार आव्हान

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. राज्यपालांच्या या पत्राला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. सुप्रीम कोर्टाने ११ तारखेपर्यंत आहे तशी परिस्थिती राहिली पाहिजे असे निरिक्षण दिले होते, त्यामुळे आता ही लढाई महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढणार असल्याचे दिसत आहे.

उद्या आम्ही मुंबईत येणार: एकनाथ शिंदे

उद्या आम्ही मुंबईत येणार आहे, असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवलं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठनेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहेत. उद्याच बुमत सिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेला मोठा धक्क; विजय शिवतारे शिंदे गटात सामील होणार? 

पुणे जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्क

माजी मंत्री विजय शिवतारे एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता

तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत युती तोडावी

सर्व पदाधिकऱ्यांसोबत बैठका सुरु असून ठराव करणार

शिवतारे आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार

भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज बैठक; केशव उपाध्ये यांनी बोलवली महत्त्वपूर्ण बैठक

भाजपच्या सर्व प्रवक्त्यांची आज सकाळी नऊ वाजता बैठक

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बोलवली महत्त्वपूर्ण बैठक

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील झूमद्वारे मार्गदर्शन करणार

भाजपने विश्वास दर्शक ठरावाबद्दल पत्र लिहिल्यानंतर बैठकीत पुढील रणनीती ठरणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com