Maharashtran Politics: विरोधी पक्षनेतेपद पुन्हा लांबणीवर,विरोधी पक्षाला खुर्ची नाही मिर्चीच, विरोधी पक्षाची खुर्ची रिक्तच राहणार?

Opposition Leader: सत्तास्थापनेच्या 100 दिवसानंतरही विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही....हाच मुद्दा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गाजला..मात्र विरोधी पक्षनेतेपद कधी दिलं जाणार? यावर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष नेमकं काय म्हणाले? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....
bhaskar jadhav
bhaskar jadhavSaam Tv
Published On

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन गाजलाय. महाविकास आघाडीने भास्कर जाधवांच्या नावाचा प्रस्ताव दिल्यानंतरही विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केली नाही.. तोच धागा पकडून भास्कर जाधवांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा विषय छेडला.. तर उपाध्यक्षांच्या निवडीनंतर शेजारची खुर्ची रिक्त ठेऊ नका, असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय...

तर विधानसभा उपाध्यक्षांच्या शेजारच्या खुर्चीचा विषय छेडताच विरोधी पक्षनेत्याची निवड लांबणीवर टाकल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत...एवढंच नाही तर विरोधी पक्षनेत्याच्या निवडीचा चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात ढकललाय...तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही हा निर्णय घाईने घेऊ का? असं म्हणत विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी वेळ लागणार हे स्पष्ट केलंय...

bhaskar jadhav
Nashik Crime : नाशिक ओझरमध्ये 'त्या' तरुणीवर सामुहिक बलात्कार नव्हे, तर...; पोलीस तपासात मोठी माहिती समोर

सत्ता स्थापनेला साडेतीन महिने पूर्ण झालेत.. दरम्यान हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलंय.. मात्र 2 अधिवेशनानंतरही विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला नाही... सध्या महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची नाही तर सत्ताधाऱ्यांनी मिर्चीच दिल्याची चर्चा आहे... त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनात तरी राज्याला विरोधी पक्षनेता मिळणार की 2014 आणि 2019 मधील लोकसभेप्रमाणे भाजप विरोधकांना विरोधी पक्षनेतेपदापासून दूर ठेवणार? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com