मुंबई: सरकारी तेल कंपन्यांनी आज परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये वाढ केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या भाववाढीचे सत्र काही केल्या थांबत नाही. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-diesel) भाववाढीची गेल्या १५ दिवसांत ही तेरावी वेळ आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात सतत होणाऱ्या भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. तसेच, देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल भाववाढीचा भडका उडाला आहे. जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे भाव.
हे देखील पहा-
आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती?
देशात सर्व राज्यांप्रमाणे आज महाराष्ट्रात (Maharashtra) देखील पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ झाली आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात देखील सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये विकले जात आहे. आजच्या भाववाढीनंतर परभणीत (Parbhani) १ लिटर पेट्रोलचे दर १२२.०१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे भाव १०४.६२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबई शहरामध्ये आज पेट्रोलचे भाव ८४ पैशांनी वाढून ११९.६७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा भाव ८५ पैशांनी वाढून १०३.९२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर पुण्यात आज पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ११९.0०७ रुपये तर डिझेलचे भाव १०१.७८ रुपयांवर पोहोचला आहे. नाशिकमध्ये आज पेट्रोलचे भाव ११९.११ रुपये तर डिझेलचे भाव १०१.८३ रुपये प्रति लिटर झाला आहे. नागपुरामध्ये आज पेट्रोलचे भाव प्रति लिटर ११९.३३ रुपये तर डिझेलचे भाव १०२.०७ रुपये प्रति लिटर झाला आहे. कोल्हापुरामध्ये आज पेट्रोलचे भाव प्रति लिटर ११९.६९ रुपये तर डिझेलचे भाव १०२.४१ रुपयांवर पोहोचला आहे.
शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 119.67 रुपये 103.92 रुपये
पुणे 119.07 रुपये 101.78 रुपये
नाशिक 119.11 रुपये 101.83 रुपये
परभणी 122.01 रुपये 104.62 रुपये
औरंगाबाद 119.97 रुपये 102.65 रुपये
कोल्हापूर 119.69 रुपये 102.41 रुपये
नागपूर 119.33 रुपये 102.07 रुपये
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.