Monsoon Withdrawal: मान्सूनच्या एक्झिटची तारीख आली समोर; राज्यातील ९ जिल्हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत

Maharashtra Monsoon Withdrawal: १० ऑक्टबरपर्यंत मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
Monsoon Withdrawal
Monsoon WithdrawalSaam TV
Published On

Maharashtra Monsoon:

राज्यात यंदा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. नैऋत्य मान्सून या आठवड्याच्या शेवटी राज्यातून एक्सिट घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पाऊस माघारी फिरण्यासाठी अनकूल वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे १० ऑक्टबरपर्यंत मान्सून माघारी फिरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. (Latest Marathi News)

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ठिकठीकाणी पावसाने दमदर हजेरी लावली. संपूर्ण महिनाभर राज्यात पावसाच्या सरी बरसल्या. मान्सून आता माघारी फिरणार असल्याने मुंबईसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे. आठवडाभर विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरी बरसतील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

महाराष्ट्रात यंदा काही जिल्ह्यांमध्ये कमी तर काही ठिकाणी जास्त पावसाच्या सरी बरसल्या आहेत. राज्यात एकूण सरासरीच्या ९७ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट कायम आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केलीये.

९ जिल्ह्यांमधील पावसाची आकडेवारी

सांगलीत चार महिन्यांत सरासरी ४८६.१ मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा २७२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सांगलीत यावर्षी ४४ टक्के पावसाची तूट आहे.

साताऱ्यात यंदा ५३५.६ मिमी पाऊस झाला आहे. सरासरी ८४४.६ मिमी पाऊस होत असतो, त्यामुळे ३७ टक्के पावसाची तूट आहे.

सोलापुरात सरासरी ४५८.१ मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा फक्त ३१९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोलापुरात ३० टक्के पावसाची तूट आहे.

मराठवाड्यातील जालन्यात सरासरीपेक्षा जास्त तूट आहे. जालन्यात सरासरी ५९१.८ मिमी पाऊस होतो. ३३ टक्के पावसाची तूट असून यंदा ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बीडमध्ये सरासरी ५५७.४ मिमी पाऊस होत असतो, मात्र यंदा ४३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बीडमध्ये २१ टक्के तूट आहे.

उस्मानाबादेत प्रत्यक्षात ४४२.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबादेत सरासरी ५७९.६ मिमी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा २४ टक्क्यांची तूट आहे.

हिंगोलीत ५८३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा २३ टक्के पावसाची तूट दिसते आहे.

पश्चिम विदर्भातील दोन जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट दिसतेय. अकोल्यात प्रत्यक्षात ५३२.९ मिमी पाऊस झालाय. सरासरी ६९४.२ मिमी पाऊस होत असतो अशात २३ टक्के पावसाची तूट दिसते आहे.

अमरावतीमध्ये सरासरी ८२२.९ मिमी पाऊस होतो. यंदा ६०४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावतीत २७ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आलीये.

राज्यातील मुंबईसह उपनगरांत, ठाणे, पालघर आणि नांदेडमध्येही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com