Chhagan Bhujbal: डासांचं पोस्टमॉर्टम केलं का? छगन भुजबळांनी घेतली आरोग्यमंत्र्यांची फिरकी

छगन भुजबळ यांनी विधानसभेत बोलताना तुफान टोलेबाजी केली
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal saam tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई - राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दोन दिवस सभागृहाचं कामकाज चालल्यानंतर सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्या. यानंतर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच गाजला. याचं कारण म्हणजे माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची मिश्किल टोलेबाजी.

हे देखील पाहा -

विधानसभेत भुजबळांनी राज्य शासनाचा कुठलासा निर्णय आणि त्यातील माहिती वाचून दाखवली. पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडुन त्याचे वर्गीकरण केले, पोस्टमॉर्टम केले, व डास घनता काढली असे उत्तर दिले होते. यावरुन छगन भुजबळांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले.

Chhagan Bhujbal
OBC राजकीय आरक्षण: सुनावणी लांबणीवर, विशेष खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश

यावर प्रश्न विचारताना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एकूण किती डास पकडले, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले. यात नर डास जास्त धोकादायक आहे की मादी डास धोकादायक आहे त्या विषयाचा आपल्याकडे रिपोर्ट आला का? असा मिश्किल सवाल छगन भुजबळ यांनी विधानसभेत करताच एकच खसखस पिकली. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का..? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का .? असे गंमतीशीर प्रश्न विचारला ज्यावर अख्खी विधानसभा खळखळून हसली.

दुसऱ्या दिवशीही आरोग्याच्या सबंधित विरोधकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सावंत पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या संबंधित प्रश्नावर नेमकी माहिती सभागृहाला देऊ शकले नव्हते. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. अखेरीस प्रश्न मागे ठेवावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com