

फोंडा घाटात इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरला आग लागलीय. भरलेला टँकर असल्याने आगीने केले रौद्ररूप धारण केले आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून घाटातील वाहतूक खोळंबली आहे. आग आटोक्यात आणल्यानंतरच घाटातील वाहतूक सुरू होऊ शकते.
उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. इतर कोणाला मंत्री पदाची शपथ द्यायची यावर आज रात्री उशिरा खलबत्त होण्याची शक्यता आहे.
हायकोर्टाच्या आदेशाने के पूर्व प्रभाग कार्यालयाकडून 17 घरांवर तोडक कारवाई करण्यात आली. दोन जेसीबी आणि 2 ट्रकच्या सहाय्याने 17 घरांवर तोडक कारवाई केलीय. अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील महाकाली रोडवरील अनधिकृत बांधकामे पालिकेने तोडली आहेत.
उद्या महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. नव्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील चार नेत्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे. यात उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांचा समावेश आहे.
मारकडवाडीत जमावबंदी आदेश झुगारल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आमदार उत्तम जानकर यांच्यासह प्रमुख ८८ कार्यकर्त्यांसह १५० अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नातेपुते पोलीस ठाण्यात मारकडवाडी प्रकरणात गुन्हे दाखल.
गेल्या तीन दिवसापासून अमरावतीसह विदर्भात ढगाळ वातावरण आहे. उद्याही अमरावती सह जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मेळघाटात पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झालाय. मुसळधार पावसाने आदिवासींची तारांबळ उडालीय.
स्कॉनचे स्वामी चिन्मयानंद यांना बांगलादेशात अटक झाली असुन, स्वामी चिन्मयानंद यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी धुळ्यातील हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. बांगलादेशातील हिंदू समाजाच्या धार्मिक स्थळांचे आणि सांस्कृतिक हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय मंचावर बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करावा, त्यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेऊन योग्य पावले उचलावीत अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे, यावेळी स्वामी चिन्मयानंद यांच्या समर्थनार्थ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.
राज भवनातील पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांची शपथ विधिबाबत कोणतेही स्पष्टता नाहीये. संध्याकाळपर्यंत शिंदे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिंदे यांनी नेतृत्व करावं , अशी आमदारांची इच्छा आहे.
राज्यपाल यांच्या भेटीनंतर महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. वर्षावर ही बैठक होणार असल्याची शक्यता आहे.
बीडच्या आष्टी शहरामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर जल्लोष करण्यात आलाय. यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशाच्या गजरात हा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपविषयी घोषणाबाजी देखील करण्यात आली.
महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महायुतीचे नेते राजभवनाकडे रवाना झाले आहेत. राज्यपालांकडे ते सत्ता स्थापनेचा दावा ते करणार आहेत.
वर्षा बंगल्यावर महायुतीच्या नेत्याची महत्वाची बैठक होत आहे. मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत ही बैठक होत आहे.
अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देवगिरीवर दाखल. राष्ट्रवादीचे नेतेही येऊ लागले आहेत.
महाराष्ट्रातल्या जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आहे
2019 मध्ये बहुमत दिलं होतं मात्र धोका दिला गेला
मात्र त्यांना 2024 ला त्यांच्या ढुंगणावर लाथ मारली
तुम्हा सर्वांचा बाप महाराष्ट्राच्या विधिमंडळात आलं आहे
संजय राऊत ही गटारगंगा आहे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे राज्यपाल यांची भेट घेणार
राजभवनावर महायुतीचे नेते घेणार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट
राज्यपाल यांची भेट घेऊन महायुती करणार सत्ता स्थापनेचा दावा
देवेंद्र फडणवीस यांची भाजप पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याने जळगावात जल्लोष
जळगाव शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत साजरा केला आनंदोत्सव
ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव साजरा
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी निवड झाल्यानंतर नंदुरबारमध्ये जल्लोष
नंदुरबार शहरात भाजप कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी.....
ढोल ताशांच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव.....
देवा भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा....
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महिला कार्यकर्त्यांनी देखील केला जल्लोष.....
शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्री करा, जालन्यातील राजुर येथे होमगार्डचे टॉवरवर चढून आंदोलन
जालन्यातील राजूर येथे होमगार्ड शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्री करण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढला आहे
मंत्रिमंडळामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांची वर्णी लागावी यासाठी या होमगार्डने हे अनोखे आंदोलन केलं आहे
सदाशिव ढाकणे असं टावर वर चढलेल्या होमगार्डच नाव आहे
देवेंद्र फडणवीस यांची गटनेता पदी निवड झाल्यानंतर अमरावतीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी केला एकच जल्लोष
माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात ढोल ताशे वाजवत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळत आनंद केला व्यक्त.....
यावेळी भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी,जयंत डेहनकर यांच्या सह अनेक जेष्ठ कार्यकर्त्यांनी लावली हजेरी
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात
निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजपचे सर्व वरिष्ठ नेते यांच्या बैठकीला सुरुवात
देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते उपस्थित
नालासोपारा विधासभेचे आमदार राजन नाईक यांचा लोकल ट्रेनने प्रवास
नालासोपारा ते चर्चगेट असा लोकल प्रवास
भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ नेते निवडीसाठी मुंबई साठी जात आहेत
लोकल ट्रेन मध्ये प्रवाश्यांशी गप्पा मारत प्रवास..नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत
नवी दिल्ली -
दोन दिवसांच्या दिल्ली मुक्कामानंतरही अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत भेट नाहीच
भेट न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईला रवाना
त्यांच्यासोबत प्रफुल पटेल आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे देखील मुंबईकडे रवाना
भेट न झाल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा
आज महायुतीच्या तिन्ही नेत्यांची होणार आहे मुंबईत बैठक
- नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांना मिळाले उद्याच्या शपथविधीचे निमंत्रण
- मार्गशीर्ष महिन्यातील उद्याचा उत्तम मुहूर्त असल्याने 5 वर्ष सरकार निर्विघ्नपणे चालेल असा महंतांना विश्वास
- 5 वाजून 57 मिनिटांनी देवेंद्रजी शपथ घेतील असा महंत सुधीरदास पुजारी यांचा अंदाज
राष्ट्रवादी कॅाग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांच्या शपथविधीसाठी इतर राज्यांचे प्रमुखही लावणार हजेरी
दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आणि आमदार आज मुंबईत येणार
महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेते लावणार हजेरी
राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना विधानसभेत मोठ यश मिळालं
बुलडाणा मतदारसंघातील ५ बूथवरील इव्हीएमची होणार पडताळणी
उबाठाच्या अवघ्या ८३५ मतांनी पराभूत झालेल्या जयश्री शेळके यांनी केला निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर.
पाच बूथ वरील माशिनची पडताळणीसाठी लागणारे २ लाख ६० हजार रु.भरले शुल्क.
या मतदार संघात शिवसेनेचे नेते संजय गायकवाड अवघ्या ८३५ मतांनी झाले आहेत विजयी.
पडताळणी नंतर येणाऱ्या निकालाकडे लागल जिल्हावासियांच लक्ष.
धनकवडी बालाजीनगरमध्ये ही मेट्रो स्थानक होणार महापालिकेकडून तत्वत्त मान्यता
स्वारगेट ते कात्रज भुयारी मार्गावर यापूर्वी या प्रकल्पामध्ये तीनच स्थानक प्रस्तावित होते
बालाजी नगर धनकवडी परिसरातील नागरिकांना स्थानक व्हावं अशी मागणी राजकीय पक्ष आणि नागरिकांनी केली होती
महापालिकेवर कोणताही आर्थिक भार येणार नाही या अटीवर बालाजी नगर स्थानक उभारण्याच्या महा मेट्रोच्या प्रकल्पाला पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे
पुणे येरवडा कारागृहातून कैदी असलेल्या आरोपीने दिली राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा
जामीन अर्ज प्रलंबित होता मात्र कैद्याची जिद्द बघून जुन्नर न्यायालयाने परीक्षा देण्याचा आदेश पारित केला
पोलीस बंदोबस्तात परीक्षा केंद्रामध्ये घेऊन जाण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी न्यायालयानचे दिला आदेश
जितेंद्र पांडुरंग घोलप असे या कैद्याचे नाव असून त्यांनी वाघोली येथील केंद्रावर पोलिस बंदोबस्तात पूर्व परीक्षा दिली आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच? चित्रा वाघ यांनी फोटो शेयर करत दिले संकेत
महाराष्ट्राचा एकच बॉस! चित्रा वाघ यांची X वर पोस्ट
देवेंद्र फडणवीस यांचा फोटो शेयर करत दिलं कॅप्शन
तुम्हारा बस पल आया था हमारा युग आयेगा असं म्हणत केला फोटो शेयर
पुणे शहरातील सर्व महायुतीचे आमदार मुंबईत दाखल
पुणे शहरातून चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उच्च व तंत्रज्ञान मंत्रिपद मिळण्याची शक्यता
२ दिवसांपूर्वी सागर बंगल्यावर घेतली होती फडणवीसांची भेट
भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ सुद्धा मुंबईत, २ दिवसांपूर्वी घेतली फडणवीसांची भेट
माधुरी मिसाळ यांना या सरकार मध्ये मंत्रीपद मिळण्याची शक्यता
कसब्याचे हेमंत रासने, शिवाजीनगर चे सिद्धार्थ शिरोळे तर कॅन्टोन्मेंट चे सुनील कांबळे सुद्धा मुंबईत दाखल
कोरेगाव भीमा आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ
आयोगाची मुदत ३० नोव्हेबरला संपल्याने राज्य सरकारने घेतला निर्णय
१ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा येथे जी दंगल झाली त्याच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात आलाय
अनेक जणांची साक्षी नोंदवण्याचं काम बाकी असल्याने आयोगाने मुदतवाढ देण्याची केली होती मागणी.
पुण्यातील बोपदेव घाट लैंगिक अत्याचार प्रकरण
५०० पानांचे दोषारोपत्र सादर
पोलिसांनी वानवडी येथील लष्कर न्यायालयात केले दोषारोपपत्र दाखल
अत्याचार करणाऱ्या दोघांना पीडितेसह तिच्या मित्राने ओळखले
शोएब बाबू शेख आणि चंद्रकुमार कनोजिया अशी अटक आरोपींचे नावे
येरवडा कारागृहात दोघांची ओळख परेड घेण्यात आली.
आरोपींचा दरोडा आणि सामूहिक बलात्कार करण्याचा होता हेतू
३ ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती घटना
पुण्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ
वेगवेगळ्या घटनेत 75 लाख रुपयांची फसवणूक
ऑनलाइन टास्कचे आमिष, विश्रांतवाडी ठाण्यात गुन्हा नोंद
घरातून काम करण्यासाठी ऑनलाईन टास्कचे अमित दाखवून चोरट्यांनी विश्रांतवाडी भागातील एका महिलेची 42 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केली
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केलाय
- मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी राज्यभरातील 400 साधू महंताना निमंत्रण
- नाशिकमधून देखील अनेक साधू महंत राहणार शपथविधी सोहळ्याला उपस्थित
- भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्याकडून साधू महंतांना निमंत्रण
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.