
धनंजय मुंडे राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प येथील शांतीसागर हॉटेलमध्ये लागली आग
हॉटेलच्या किचनमध्ये आग लागल्याची प्राथमिक माहिती
अग्निशामक दलाने अर्ध्या तासात मिळवले आगीवर नियंत्रण
आगीत हॉटेलच्या किचनचे झाले नुकसान, पण जीवितहानी झाली नाही
वडखळच्या अंगणवाडीत धक्कादायक प्रकार
लहान मुलांच्या पोषण आहार पाकिटात मेलेला उंदीर
अंगणवाडी ताईच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
घटनेने पालकवर्गात घबराट
पाकीट तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले
बालकांना होणारा पुरवठा थांबवण्याचे आदेश
ठाण्यातील पाचपाखाडीत इमारतीला आग
कृष्णा इमारतीच्या आठव्या मजल्यापासून १५ व्या मजल्यापर्यंत लागली आग
आग लागल्यानंतर १५ जणांना अग्निशमन दलाचा जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
डकमध्ये सदरची आग लागली होती. आता आग आटोक्यात आहे
स्वयंघोषित साधू आसाराम बापू यांच्या वकिलाला धमकी
मेलवरून मिळाली धमकी
वकिल पत्र घेतल्यास जीवे मारण्याची धमकी
रामचंद्र भट असे आसाराम बापू यांच्या वकिलाच नाव
ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी वकिल भट दाखल
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात कोंडून घेऊन सुरू असलेले मराठा तरुणांचे आंदोलन स्थगित
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सरकारने तात्काळ दखल घेण्याची मागणी
आंदोलन स्थळी वैद्यकीय सुविधा पुरवण्याची ही मागणी
पुढील काळात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर यापेक्षा तिव्र आंदोलनाचा दिला इशारा
- बिलासपूर-बीकानेर एक्सप्रेस मध्ये प्रवाशांकडून तिकीट तपासणीच्या नावावर पैसे उकळणाऱ्या तोतया टीसीला नागपूर रेल्वे पोलिसांनी अटक केली.
- संयोग कुमार साहू असून असं आरोपीच नाव आहे. तो रायपूरचा रहिवासी आहे. नागपूर रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत जीआरपीएफच्या हवाली केले.
- तोतया टीसी हा काळा कोट घालून, रेल्वेचा बनावट आयडी कार्ड लावून दंड वसुली करत होता. सुरुवातीला तो अधिकृत टीसी वाटत होता. पण त्याच्या संशयास्पद वागणुकीमुळे काही प्रवाशांना शंका आली. प्रवाशांनी याची तक्रार इतर रेल्वे कर्मचाऱ्यांकडे केली.
एकतर्फी प्रेमातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट.
बीडच्या वडवणी तालुक्यातील चिंचवडगाव येथील घटना.
शेतातील झाडाला गळफास घेऊन त्याने जीवन संपवले.
घाटकोपर पूर्वेतील हेडक्वार्टर बार व रेस्टॉरन्टच्या मालकाची चौकशी केल्यामुळे संतापलेल्या बार मॅनेजर आणि वेटर यांनी पिता पुत्राला बेदम मारहाण केली
या मारहाणीत ४० वर्षीय हर्ष लालन मृत्यू झाला असून या व्यक्तीचे ६१ वर्षीय वडील किरण लालन हे जखमी
ही घटना सोमवारी रात्री घडली असून प्रकरण पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे ते पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल
हिंगोलीत सामाजिक न्याय विभागाच्या वस्तीगृहात गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पौर्णिमा विलास कांबळे असे या विद्यार्थिनीचे नाव असून, आर्थिक दुर्बल घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाने सुरू केलेल्या वस्तीगृहात पौर्णिमा शिक्षण घेत होती.
- पुण्यातून 'महाकुंभ'ला जाणाऱ्या बस, रेल्वेगाड्या फुल्ल
- प्रयागराजला रेल्वेचे वेटिंग
- खासगी वाहनाने जाताना घ्या काळजी..
- पुण्यातून फेब्रुवारीत धावणार ४०० खासगी बस
- १२ ते १३ रेल्वे पुण्याहून प्रयागराजसाठी
- पुणे ते प्रयागराज सुमारे ३ हजार किलोमीटरचे अंतर आहे. ते लवकर पार करण्यासाठी वाहनचालक कमीत कमी थांबे घेत वाहने चालवत आहेत.
- बस भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना उबाठाने केलं रास्तारोको
- बसस्थानकाच्या बाहेर रास्तारोको केल्यानं वाहतूक विस्कळीत
- रास्तारोको झाल्याने वाहनांच्या लागल्या रांगा
मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मातोश्रींना अश्रु अनावर.....
आज देशमुख कुटुंब अंतर्वली सराटीत जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाला आहे...
मनोज जरंग यांच्या आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे...
जिल्हा दंडाधिकारी यांच्या कार्यालयात मराठा आंदोलक घुसले स्वतःला कोंडून घेत आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आंदोलक आक्रमक
जिल्हाधिकारी सचिन ओंबासे कार्यालया बाहेर
मागील ९ वर्षांपासून सुखसागरनगर भागातील ई-लर्निग शाळा पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भीक मागो आंदोलन करण्यात आलं आहे.
कांदिवली येथे पत्नीसह चार वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या करून आत्महत्येचा बनाव करणाऱ्या आरोपी पतीला अखेर समता नगर पोलिसांनी अटक केली आहे,
शिवशंकर दत्ता (४० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून दुहेरी हत्येच्या याच गुन्ह्यात त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे,
बीडच्या चकलांबा येथे गोपाल उनवणे या तरुणास जमावाने पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण केल्याची घटना रात्री घडलीय.. या प्रकरणात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे.
- वर्ध्यातील मुख्य बस्थानकाजवळ चक्काजाम आंदोलन
- एसटी भाडेवाड विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आक्रमक
- परिवहन मंत्री विरोधात तसेच सरकार विरोधात शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
- जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन
- आंदोलनात सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी
- पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना घेतले ताब्यात
शहादा तालुक्यातील टेंभे सारंगखेडा येथे धाडसी घरफोडी...
घरफोडीत 50 ते 60 लाखाचा मुद्देमाल लंपास...
50 तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला .....
ग्रामीण भागात भीतीचे वातावरण.....
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
हॉली एंजल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसने घेतला पेट
बसमध्ये विद्यार्थ्याना शाळेत सोडल्यानंतर पार्किंग मध्ये उभे असलेल्या बसने अचानक घेतला पेट
सुदैवाने विद्यार्थी बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
उपस्थितांनी पाणी मारत विझवली आग
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व खात्यांचा कारभार तेच चालवत आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकार स्वतःकडे ठेवले आहेत, त्यामुळे हे महायुतीच सरकार नसून भाजपचं सरकार आहे अशी जोरदार टिका ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणाऱ्या मांजरा नदीच्या पुलावरचा रस्ता दुरुस्तीसाठी, संघर्ष समितीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी केज - कळंब महामार्ग अडवला होता. तर यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी मध्यस्थी करत प्रशासनाला धारेवर धरले
एकीकडे लाडक्या बहिणीना पैसे द्यायचे दुसरीकडे महागाई वाढवून ,एसटी भाडे वाढवून ते दुपटीने परत घ्यायचे... ठाकरे गटाचा आरोप
महायुती सरकारने एसटी भाड्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ केली या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतलाय . राज्यभरात ठाकरे गटाने महायुती सरकार विरोधात आंदोलन छेडले . आज कल्याण जवळील विठ्ठलवाडी एसटी डेपो मध्ये ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धडक देत चक्काजाम आंदोलन केले.
शिवसेना उबाठाच्या संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर उबाठाला मोठी गळती
शिवसेना उबाठाचे अनेक शाखाप्रमुख पदाधिकारी व विभाग प्रमुख आज करणार शिंदेच्या सेनेत प्रवेश
शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी संध्याकाळी प्रवेश
मोठ्या संख्येने शिवसेनेला खिंडार तर शिंदे सेनेकडे इनकमिंग सुरू
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेकडे मोठी इन्कमिंग
कालच शिवसेना उबाटा गटाचे नेते संजय राऊत आमदार सचिन आहेर यांच्या उपस्थितीत झाली होती बैठक
बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी
नाराजीचा फायदा शिंदे सेनेला
नवी मुंबईतून सहा बांगलादेशी नागरिकांना पकडले.
नेरुळ येथे विकासकामार्फत बांधकाम चालू असलेल्या ठिकाणाहून घेतले ताब्यात.
नेरुळ पोलिसांनी कारवाई करत ६ बांगलादेशी नागरिक पकडले.
नवी मुंबई मध्ये इमारतीच्या कामासाठी बांधकाम साईट्सवर मजुरांची आवश्यकता.
बांगलादेशी नागरिक कमी पैशात काम करण्यासाठी उपलब्ध होत असल्याने कंत्राटदार बांगलादेशी नागरिकांना काम देत असल्याची माहिती.
सर्व बांधकाम साईट्स वर पोलीसांची राहणार करडी नजर.
- नाशिक मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
- राज्य परिवहन महामंडळाने केलेल्या बस प्रवासी दरवाढीच्या विरोधात आंदोलन
- नाशिकच्या नवीन मध्यवर्ती बस स्थानकात ठाकरे गटाचे आंदोलन
- एसटीच्या भाड्यात जवळपास १४.९५% वाढ करण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक
- एसटी बरोबरच 1 फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढीविरोधात आंदोलन
- राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने चिखली परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैधरीत्या गॅस रीफेरिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दा फाश केला आहे. ,
या कारवाईत 126 गॅस सिलेंडर सह 8 लाख 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणांत शशिकांत शंकर भांगरे, सागर सूर्यकांत मिरगाजी , अमर महादेव साठे, योगेश गंगाधर गुंडले यां आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे
GBS रुग्णांसंदर्भात कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अलर्ट मोडवर
कोल्हापुरात आढळले 2 रुग्ण
GBS रुग्णांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात वाढ झाल्यास 70 व्हेंटिलेटर तयार, औषदांचा साठा तयार
या पूर्वी महिन्याला किमान 2 रुग्ण GBS चे घेतात उपचार
नागरिकांनी घाबरून न जाण्याचे जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ.एस.एस. मोरे यांचे आवाहन
पालघरमध्ये जमिनीच्या वादातून पालघरच्या नागझरी येथे दोन गटात तुंबळ हाणामारी
मनोर पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या नागझरी येथे दोन गटात हाणामारी
कौटुंबिक वादातून हाणामारी झाल्याची माहिती समोर
हाणामारीत महिलांना देखील बेदम मारहाण
मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
जखमींवर नागझरी येथील रुग्णालयात उपचार सुरू
नंदुरबार -
शिवसेना शिंदे गटातील जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही
विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचार केल्याचा ठपका
आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेल्या किरसिंग वसावे यांच्या यांच्या निलंबनामुळे आदिवासी समाजात तीव्र संताप
शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी केले, वसावे यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबनाचे कार्यवाही
जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांच्या पक्षातून हकालपट्टीने राजकीय वर्तुळात खळबळ
अक्कलकुवा विधानसभा क्षेत्रात पक्षाचे उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवार यांच्या प्रचार केल्याने पक्षातून हकालपट्टी
किरसिंग वसावे शिंदे गटात राहतात की इतर पक्षात जातात हे पहा महत्त्वाचे ठरणार आहे
शिवसेना शिंदे गटातील जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही
विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचार केल्याचा ठपका
मनोज जरांगे पाटील हे 25 जानेवारी रोजी पासून हे उपोषणाला बसलेले
मनोज जरांगेंची प्रकृती अत्यंत खालावत असून त्यांच्या मागण्या सरकारने लवकर मान्य करण्यात यावे
या सामूहिक उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धानोरा तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील मराठा तरुण बांधव 200 फूट उंचीवर टॉवरवर जाऊन आंदोलन करण्यात येत आहेत.
यावेळी राधाकृष्ण काकडे, आप्पा काकडे, ज्ञानेश्वर काकडे, सोमीनाथ काकडे सह आदीची या आंदोलनाला उपस्थित होते.
सांगलीच्या विटामधून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त
सांगली जिल्ह्यातील विटा येथे एमडी ड्रग्ज साठ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
एमआयडीसीतील एका कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला.
काल रात्री उशिरा एमआयडीसी येथील माऊली इंडस्ट्रीज या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली
ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ साठा जप्त करण्यात करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
30 जानेवारी रोजी त्यांचा नियोजित बीड जिल्हा दौरा आहे.
या पार्श्वभूमीवर बीड शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.
बीड शहरात कार्यकर्त्यांनी भव्य अशी बॅनरबाजी केली आहे.
विशेष म्हणजे यावेळी पंकजा मुंडे समर्थकांनी देखील बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
नागपूर -
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नागपूर जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाचा इशारा
विकास कामांचे वर्क ऑर्डर थांबवल्यामुळे या विरोधात आंदोलनाचा इशारा
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्या नेतृत्वात असणार आंदोलन
अमरावती जवळच्या रहाटगाव जुनी वस्तीमध्ये स्मशानभूमीच्या जागेसाठी शेकडो ग्रामस्थांचे स्मशानभूमीतच अर्ध नग्न आंदोलन व उपोषण..
स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा रहाटगावच्या ग्रामस्थांचा आरोप..
वारंवार प्रशासनाकडे तक्रार आणि पाठपुरवठा करूनही तोडगा न निघाल्याने आणि उपसले उपोषण आणि अर्धनग्न आंदोलनाचे हत्यार...
आंदोलनात मोठया संख्येने महिलाही सहभागी....
जोपर्यंत आम्हाला स्मशानभूमीसाठी ची जागा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, आंदोलनकर्त्यांची भूमिका...
पुणे - शिवसेना उबाठाच्या संजय राऊत यांच्या दौऱ्यानंतर उबाठाला मोठी गळती
शिवसेना उबाठाचे अनेक शाखाप्रमुख पदाधिकारी व विभाग प्रमुख आज करणार शिंदेच्या सेनेत प्रवेश
शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी संध्याकाळी प्रवेश
मोठ्या संख्येने शिवसेनेला खिंडार तर शिंदे सेनेकडे इनकमिंग सुरू
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेकडे मोठी इन्कमिंग
कालच शिवसेना उबाटा गटाचे नेते संजय राऊत आमदार सचिन आहेर यांच्या उपस्थितीत झाली होती बैठक
बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी
नाराजीचा फायदा शिंदे सेनेला
रत्नागिरी - बंदर मंत्री नितेश राणे यांचा बुलडोझर चालला
मिरकरवाडा बंदरामधील अनधिकृत बांधकामे भूईसपाट
मिरकरवाडा बंदराने घेतला मोकळा श्वास
आज मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकाम हटाओ मोहिमेचा दुसरा दिवस
३१९ अनधिकृत बांधकामे हटवण्यात मत्स्य विभागाला यश
मिरकरवाडा बंदरातील मासे विक्री आज देखिल राहणार बंद
आज देखिल पोलिसांचा मोठा बंदोबस्त, २५ एकर परिसरात होते अतिक्रमण
आज दुसऱ्या दिवशी जमीन दोस्त केलेली अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी सपाटीकरण केले जाणार
कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यातील निवृत्त प्राध्यापिकेला 30 लाखांचा गंडा
डिजिटल ऍरेस्ट ची भीती दाखवत भामट्याने घातला गंडा
मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची केली बतावणी
17 जानेवारी पर्यंत भामट्याने उकळले तीस लाख रुपये
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं कळताच निवृत्त प्राध्यापिकेची आजरा पोलीस ठाण्यात तक्रार
धाराशिव च्या तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखाली तीन जणांचे मृतदेह सापडले होते.
या तिघांचा मृत्यू पुलाला संरक्षण भिंत नसल्याचे दुचाकीवरून पाण्यात पडून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सोमवारी दुपारच्या सुमारास हे तिन्ही मृतदेह तरंगताना स्थानिकांच्या निदर्शनास आले होते.
त्यानंतर हे मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटविण्यात देखील पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
रत्नागिरी - चिपळूणमधील गोवळकोट भोईवाडी महिला मंडळातर्फे वाशिष्ठी नदी पूजन
वाशिष्टी नदीची भरली जाते ओटी अनेक महिलांचा सहभाग
भोई समाज महिला मंडळाचा अनोखा उपक्रम
वाशिष्टीचे नदीच्या उपकाराची जाणीव
मासेमारी या व्यवसायासाठी वाशिष्टी नदीवर अवलंबून
भोई समाजाचे कुटुंब या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाद्वारे वाशिष्ठीचे ऋण उतरवण्याचा प्रयत्न
पुण्यात थैमान घातलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण नागपुरात मिळून आले आहे.
यात एका रुग्णावर अतिदक्षता विभागात विचार सुरू आहे.
तर एक रुग्ण हा जनरल वार्डमध्ये उपचार घेत आहे.
इतर तीन रुग्णांना सुट्टी झाल्याची माहिती आहे.
तर काहीं रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे...
तेच नागपूर महानगरपालिकेमधून शहरांमध्ये पोलिओ सर्वेलन्स केले जाते.
यात मागील तीन महिन्यांमध्ये 5 ते 6 मुलांमध्ये जीबीएस मिळून आला होते.
आता मात्र त्यांची परिस्थिती सुस्थित असल्याच मनपा आरोग्य प्रशासनाकडून सांगितलं जातं आहे.
नाशिक-
- मालेगावातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या निलंबनाविरोधात राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना आक्रमक
- बोगस बांगलादेशी दाखले प्रकरणी तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना करण्यात आले होते निलंबित
- जन्म मृत्यू दाखले हे स्थानिक नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीचे अधिकार
- दाखल्यानुसार देण्यात आलेले प्रमाणपत्र असल्याने यात स्थानिक स्वराज्य संस्था दोषी
- तहसीलदार ,नायब तहसीलदाराला आपली बाजू मांडण्यासाठी संधी द्यावी असे महसूलमंत्र्यांना निवेदन
- तहसीलदार कार्यालयातील पाच जणांना निलंबित करण्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी
नाशिकमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने केले रेक्यू
नाशिकच्या येवला तालूक्यातील भिंगारे येथिल शेतकरी रावसाहेब गाडे या शेतक-याच्या शेतात बिबट्या पडला होता
वनविभागाला माहिती मिळताच रेक्यू पथकाने घटनास्थळी धाव घेत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढले
त्यानंतर त्याला उपचारासाठी निफाड येथे पाठवण्यात आले
दोन दिवसांपूर्वीच एक बिबट्या परिसरातील एका विहिरीत मृतावस्थेत आढळला होता
ठाकरे गटाच्या राजुल पटेल यांनी शिंदे गटात प्रवेश करताच शिवसेना शाखेला ठोकले टाळे
ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक
माजी मंत्री अनिल परब स्वतः उतरले रस्त्यावर
ठाकरे गटाचे शेकडो शिवसैनिक शाखेवर जमा
रात्री जोगेश्वरी बेहराम बाग शिवसेना शाखेसमोर हाय व्होल्टेज ड्रामा
ठाकरे गटाचा शिवसेना शाखेवर दावा
राजुल पटेल विरोधात घोषणाबाजी
शाखेला पोलीस छावणीचे रूप
दोन्ही गटाकडून शाखेला लावण्यात आले टाळे
पुण्यात पीएमपीचे लवकरच दोन नवे ई डेपो
चरोली, हिंजवडीमध्ये नवे प्रस्तावित डेपो
ई डेपोची संख्या होणार सात
पीएमपीच्या तापीतील विभक्ती संख्या 490 नव्याने अजून शंभर बस दाखल होणार
पीएमपी ची ई डेपो ची संख्या अगोदर पाच होती आता सात होणार
पुण्यात आता पोलिसांची गस्त अहोरात्र
पुणे पोलीस आयुक्तांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
कॉप 24 अंतर्गत 726 पोलिसांची गस्त
कॉप 24 अंतर्गत 526 पुरुष कर्मचारी आणि 200 महिला कर्मचारी कार्यरत असतील
हे कर्मचारी 21 ते 30 वयोगटातील आहे त्यामुळे तत्पर सेवा देण्यास सक्षम
कॉप 24 साठी 125 दुचाकी आणि 39 चार चाकी वाहने दिली जाणार
बारा बारा तासाच्या दोन शिफ्ट मध्ये पोलीस शहरात गस्त घालणार
शहरातील रस्ता पोलिसांचे अस्तित्व वाढवण्यासाठी आणि पर्याय आणि पुणेकरांना तातडीने मदत पुरवण्यासाठी शहर पोलिसांकडून 24 उपक्रम राबविण्यात येणार असून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पुणे - साखर उत्पादनाला जोर पुणे विभागात आत्तापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन
पुणे विभागातील ऊस गाळप हंगामाने जोर पकडला असं सरासरी 8.8% उताऱ्यानुसार 102 लाख 3 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे
114 92 हजार टन उसाचे गाळे पूर्ण झाले आहे राज्यात साखरेचा सर्वाधिक उदार कोल्हापूर विभागात 10.39% आहे
पुढील काही दिवसांमध्ये साखरेचा उतार आणि वाढण्याची शक्यता आहे
पुणे विभागात सहकारी आणि खाजगी असे 31 साखर कारखान्याचे पूर्ण क्षमतेने गाळप सुरू आहे.18 सहकारी 13 खाजगी कारखान्यांचा समावेश..
31 साखर कारखान्याने दैनंदिन उसगाव क्षमता 2 लाख 9 हजार 950 टन एवढे आहे
यावर्षीचा गाळप हंगाम 130 ते 140 दिवस सुरू राहणे अपेक्षित आहे.
येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत पोलिस आयुक्तांच्या आदेशाने जुगार अड्डयावर कारवाई
नऊ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
यापैकी तीन शिट्ट्या देणारी बुके व चार खेळणारे मिळाले
ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडून 9 हजार 270 रोख रक्कम जुगार खेळणाऱ्यांच्या दोन मोटरसायकली व आठ मोबाईल एकूण 1लाख 5 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय
कोल्हापूरच्या टाकवडेमध्ये आनंदी स्वीट्स अँड नमकीन कारखान्याला भीषण आग
आगीमध्ये कारखाना जळून बेचिराख
कारखान्याला लागलेल्या आगीत दोन गॅस सिलेंडरचा झाला स्फोट
शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती
कोणतीही जीवितहानी नाही
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.