Maharashtra News Live: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट, दोन जण जागीच ठार , दोघे गंभीर जखमी.

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 26 December 2024: आज गुरूवार दिनांक २६ डिसेंबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील थंडीची लाट आणि पाऊस, हवामान खात्याकडून अलर्ट, सतीश वाघ हत्या प्रकरण अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking Live Marathi
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट, दोन जण जागीच ठार , दोघे गंभीर जखमी..

: जालन्यातील परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट होऊन दोन जण जागीच ठार झाले असून दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे..कारखान्यातील सल्फर टाकीचा स्फोट झाल्याने हि दुर्घटना घडली आहे..आप्पासाहेब पारखे आणि अशोक देशमुख यांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला आहे. तर नवनाथ पंढरपोटे आणि कदिर युनूस पटेल हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे.

नाशिक पुणे रोडवरील पळसे टोल नाक्यावर कारने अचानक घेतला पेट

टोलनाका कर्मचाऱ्यांच्या सतर्कमुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने संपूर्ण गाडी जळून खाक झालीय. टोलनाक्यावर वाहनांचे लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचा मुद्दा लवकरच निकाली निघेल : तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिल्यानंतर त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू आहे. तशी नाराजी त्यांनी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. याबाबत पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ हे सध्या परदेशात आहेत. समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहोत. जेव्हा भुजबळ हे परत येतील त्यावेळी हा मुद्दा निकाली निघेल. ही पक्षांतर्गत बाब आहे, असं तटकरे यांनी स्पष्ट केलं.

Vasai Car Accident : वसईत कारनं लहानग्याला चिरडलं, ड्रायव्हरला अटक

वसईतील वालीव हद्दीत एका चिमुकल्याला चिरडणाऱ्या वाहनचालकाला अटक

चिमुकल्याला चिरडल्याचा सीसीटीव्ही आला होता समोर

वालीव पोलिसांनी या टुरिस्ट वाहन चालवणाऱ्या आरोपीला केली अटक

चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू, प्रकृती चिंताजनक

Beed News : हवेत गोळीबार करणारा कैलास फड अटकेत

परळीत हवेत गोळीबार केल्याचे प्रकरण

आरोपी कैलास फड याला अटक

परळी शहर पोलिसांनी.केली अटक

फड याला एका दिवसाची पोलीस कोठडी

परळी न्यायालयाने सुनावली कोठडी

संतोष देशमुख खून प्रकरण, चौकशीसाठी सीआयडीचे पथक संभाजीनगरकडे रवाना

बीडच्या मस्साजोग येथील स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या चौकशीसाठी, सीआयडी विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांच्यासह पथक आज सकाळी बीडमध्ये दाखल झाले होते. या पथकाने बीडमध्ये पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यासह अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर हे पथक केज येथे रवाना झाले होते.

केजमधील शासकीय विश्रामगृहात सीआयडी विभागाचे अधिकाऱ्यांनी तेथील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली.. तब्बल चार तास ही सर्व प्रक्रिया सुरू होती यानंतर हे पथक आता संभाजीनगरकडे रवाना झाले असून या चौकशीतून नेमके काय समोर आले ? हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.

संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा निघणार असून सुभाष रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. यापूर्वी हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.. परंतु आता हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे.. दरम्यान या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात मोठमोठे डिजिटल बॅनर्स लावण्यात आले आहेत.. तसेच या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील या डिजिटल बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

सतीश वाघ हत्या प्रकरण; मोहिनी वाघ यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

मोहिनी वाघ यांच्या बरोबर सतिश वाघ अपहरण आणि खून प्रकरणात याआधी अटक केलेल्या चार आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. हत्या कोणत्या कारणासाठी केली हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मोहिनी वाघ यांना पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती.

रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात

अंजणारी घाटात कार, टेम्पो आणि कंन्टेनरचा विचित्र अपघात घडलाय. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. सतत घडत असलेल्या अपघातांमुळे, अंजणारी घाटातील रखडलेला चौपदरीकरणाचा रस्ता पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांची केलीय.

उद्धव ठाकरे यांची पदाधिकारी आढावा बैठक

आज उद्धव ठाकरे यांनी विभागप्रमुख, शाखाप्रमुख, महत्वाच्या पदाधिकारी यांनी बैठक बोलवली आहे. बोरिवली विधानसभा, दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभेच्या महत्वाच्या पदाधिकारी यांना बैठकीसाठी बोलावलं आहे.या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे.

सतीश वाघ खून प्रकरण; आरोपी पत्नी मोहिनी वाघ यांना कोर्टात हजर केलं जाणार

सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपी पत्नी मोहिनी वाघ यांना काही वेळात कोर्टात हजर केले जाणार. पोलिसांनी अटक केली होती. काही वेळात आरोपी पत्नी मोहिनी वाघला फरासखाना पोलीस स्टेशनमधून बाहेर आणलं जाणार आहे.

Maharashtra News Live Updates: - नाशिक जिल्ह्यात एक जानेवारीपर्यंत शस्त्रबंदी लागू

- नाशिक जिल्ह्यात एक जानेवारीपर्यंत शस्त्रबंदी लागू

- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश

- पोलीस आयुक्तालय हद्द वगळता नाशिक ग्रामीण जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेश लागू

- ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

- लग्नकार्य , प्रेतयात्रा, तालुका आठवडे बाजार यांना नसणार जमावबंदी आदेश

- सभा, मिरवणूका यांच्यासाठी लागणार रीतसर परवानगी

Maharashtra News Live Updates: जालन्यात भाजपचाच महापौर होणार - रावसाहेब दानवे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधी कधी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणारे पैकी आम्ही आहोत.
रावसाहेब दानवे

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद

- त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद

- नाताळातील सुट्ट्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेत मंदिर प्रशासनाचा निर्णय

- राज शिष्टाचार संबधी अतिमहत्त्वाचे व्यक्ती वगळता इतरांसाठी व्हीआयपी दर्शन राहणार बंद

- 5 जानेवारी 2025 पर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन सेवा बंद

- रांगेतील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Pune News: पुण्याजवळील थेऊर फाट्यावरील काकडे मळ्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी

- पुण्याजवळील थेऊर फाट्यावरील काकडे मळ्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी

- ⁠छापीमारीत बांगलादेशाच्या संशयित नागरिकांना पकडल.

- हरुलाल पंचलाल बिश्वास अस छापेमारीत पकडलेल्या संशयित बागलादेशी नागरिकाचे नाव.

- ⁠हरूलाल हा मूळचा बांगलादेशचा रहिवाशी असून आरोपींन बेकायदेशीर रित्या भारतामध्ये प्रवेश करून मतदान कार्ड आधार कार्ड आणि भारतीय सगळे कागदपत्र बनावट बनवले आहेत.

- या प्रकरणी आरोपी विरोधात लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Nashik News: सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता 5 जानेवारीपर्यंत 24 तास राहणार सुरू

- सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता भाविकांना दर्शनासाठी 5 जानेवारीपर्यंत 24 तास राहणार सुरू...

- नववर्ष आणि नाताळसणाच्या सुट्ट्यांमुळे गर्दी वाढणार असल्याने प्रशासनाने घेतला निर्णय... संभाव्य गर्दी लक्षात घेता रस्ता वाहतुकीस खुला...

- 5 जानेवारीपर्यंत सप्तशृंगी गड घाट रस्ता 24 तास राहणार खुला तर त्यानंतर पुन्हा जाळ्या लावण्याचे काम होणार सुरू...

- सप्तशृंगी गड घाट रस्त्याचे संरक्षक जाळी बसवण्याची काम 70 टक्के पूर्ण...

- घाट रस्त्यात अडथळा ठरणारे सैल खडक, झुडपे आणि डोंगरावरून घरंगळत येणारे दगड अडवण्यासाठी संरक्षक जाळ्या लावण्याचे काम अंतिम टप्प्यात...

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, CID चे पथक बीडमध्ये दाखल

सीआयडी चे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये दाखल

अप्पर पोलीस महासंचालक. सी आय डी प्रशांत बुर्डे दाखल

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन करणार पाहणी.

देशमुख कुटुंबाची घेणारं भेट

तसेच आत्तापर्यंतच्या तपासाची पोलीस अधीक्षक यांच्याकडून घेतली माहिती

Navi Mumbai News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पनवेल आगारात पाहणी दौरा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पनवेल आगारात पाहणी दौरा

पनवेल आगारात पुरविण्यात येणाऱ्या सुख सुविधा आणखी नागरिकांना येणाऱ्या अडचणी प्रताप सरनाईक यांनी जाणून घेतल्या.

अस्वछ शौचालय, शौचालयात अपंग व्यक्तीसाठी नसलेल्या सुविधा ्यासोबतच आगारात ठेवण्यात आलेल्या भंगार गाड्या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब.

प्रवाशांसोबत खेळ प्रताप सरनाईक यांनी साधला संवाद.

Ambernath News: अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयात सापडली ८ फुटी धामण

अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयात ८ फुटी धामण

सर्पमित्रांनी धामणीला पकडून जंगलात सोडलं

कार्यालयाला सुट्टी असल्यामुळे अनर्थ टळला

Kalyan News: कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण, आरोपीला २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

कल्याण अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरण

नराधम विशाल गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

ओरपीने १३ वर्षांच्या मुलीचे अपहरण केले

घरी नेऊन मुलीवर अत्याचार करत केली होती हत्या

Wardha News: रेल्वेच्या आरक्षणाची वेबसाईट तांत्रिक कारणामुळे बंद

- आयआरसीटीची रेल्वेच्या आरक्षणाची वेबसाईट तांत्रिक कारणामुळे बंद

- वेबसाईट बंद झाल्याने नागरिकांना अडचण

- तात्काळ रिजर्वेशन काढणाऱ्यांना फटका

- या दहा दिवसात दुसऱ्यांदा वेबसाईट बंद

- सुट्टीचे दिवस असल्याने नागरिकांना अडचण

- फिरायला गेलेल्या अनेक नागरिकांच्या तिकीट अडकल्या

- अचानक वेबसाईट बंद झाल्याने तारांबळ

- तात्काळ आरक्षणाच्या वेळीच वेबसाईट बंद

Kolhapur News: आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अचानक दिली कसबा बावड्यातील रुग्णलयाला भेट

कोल्हापूर - कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली अचानक भेट

आरोग्यमंत्र्यांनी अचानक भेट दिल्याने प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ

सेवा रुग्णालयाची प्रशस्ती इमारत बंद का ठेवली याचा विचारला जाब?

सेवा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना सीपीआर रुग्णालयाकडे का पाठवले जाते?- आबिटकर

रुग्णालयातील विविध समस्यांबाबत 30 तारखेला बोलावली बैठक

Pune News:  पुणे शहरातील 29 रक्तपेढ्यांना शासनाचा दणका

पुणे शहरातील 29 रक्तपेढ्यांना शासनाचा दणका

नियमभंग करणाऱ्या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने शासनाकडून रद्द

पुणे विभागात रक्ताचा तुटवडा असताना काही रक्तपेढ्यांनी नियमांचा भंग करून परराज्यात रक्त आणि रक्त घटकांची विक्री केल्याने करण्यात आली कारवाई

नियमांचे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करत 29 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून शहरातील 81 संस्थांची तपासणी

29 जणांची परवान विरुद्ध 32 रक्तपेढ्याना कारणे दाखवा नोटीस

Nagpur News: नागपूरात ढगाळ वातावरण, किमान तापमानात वाढ

- गेल्या तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणमुळे किमान तापमानात वाढ

- 24 तासात पारा 2.7 अंश सेल्सियसने वाढला....बुधवारी17.7 अंश किमान तापमानाची झाली होती नोंद

- सरासरी पेक्षा 5.7 अंश सेल्सियस अधिक आहे

- तर काही भागात पावसाचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला...

Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज

यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज

जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

27 ते 28 डिसेंबर दरम्यान गारपीट सह वादळ वारा आणि पावसाचा अंदाज

Ratnagiri News: रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी

रत्नागिरी - कोकण सध्या पर्यटकांनी फुलून गेलय

रत्नागिरीतील समुद्रकिना-यांवर सध्या पर्यटकांची गर्दी पहायला मिळतेय

गोव्या पाठोपाठ सर्वाधिक पसंती कोकणाला

कोकणच्या सौदर्याची पर्यटकांना भुरळ

त्यामुळे पर्यटकांनी कोकण सध्या फुल झालय

Amravati News: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बस आगारातून बस फेऱ्या लेट

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर बस आगारातून बस फेऱ्या लेट

विद्यार्थी आणि प्रवाशांची तारांबळ

संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी दर्यापूर बस स्थानक परिसरात रात्री केले बस रोको आंदोलन केले

यावेळी मोठ्या प्रमाणात झाली होती वाहतूक कोंडी

विद्यार्थी आणि प्रवासी यांनी नियमित बसेस सोडण्याची केली मागणी

Amravati News: अमरावतीच्या इर्विन चौकातल्या स्पा सेंटरवर काही नागरिकांकडून धाड

अमरावतीच्या इर्विन चौकातल्या स्पा सेंटरवर काही नागरिकांकडून धाड

स्पा सेंटरच्या आतून देहविक्रीचा व्यवसाय चालत असल्याचा संशय

घटनास्थळावर पोलिसांना पाचारण, एका व्यक्तीला घेतले ताब्यात, चौकशी सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com