

पिंपरी चिंचवड शहरातील सेक्टर १०, भोसरी एमआयडीसी परिसरातील ऋषी पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड नामक कंपनीला भीषण आग लागलीय. ही आग सुमारे पावणे आठ वाजता लागल्याची शक्यता आहे. कंपनीमध्ये रब्बर आणि प्लास्टिकच्या वस्तू तयार होत असल्याची माहिती आहे. कंपनीमध्ये भीषण आग लागल्यानंतर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या १० पेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
उद्धव ठाकरेंचं सरकार असताना शक्ती कायदा विधी मंडळाने मंजूर केला होता. आपण ज्यांच्या सोबत आहात त्याचं सरकार केंद्रात आहे, जर तुमचं ऐकत असतील तर शक्ती कायदा लवकरात लवकर मंजूर करायला सांगा, शक्ती कायदा मंजूर झाला तर या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण येईल, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी भरत गोगावले यांना केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वाराज्य संस्था निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलंय. येत्या ३ ते ४ महिन्यात निवडणुका होतील, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे.
अमित शहा म्हणजे देशातील फोडाफोडीचे सगळ्यात मोठे जनक. महाराष्ट्राच्या राजकारणात पवार यांनी दगा फटका केल्याचा आरोप अमित शहा यांनी केला. अमित शहा यांनी गेल्या १२ ते १५ वर्षांचा त्यांच्या पक्षाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहावा. त्यांच्या पक्षाने देशातल्या सगळ्या राज्यात पक्षांची फोडाफोडी केलीय.
महाराष्ट्रातले दोन मुख्य पक्ष फोडण्याचा आणि त्यांचे पक्ष आणि चिन्ह पळवण्याचा काम भाजपनं केलंय. भाजप आणि अमित शहा यांनी देशातील राजकीय संस्कृती संपवलीय, अशी सणसणीत टीका शरद पवार गटातील नेते प्रशांत जगताप यांनी केलाय.
माझी पतंग कुणी कापली नाही. मी येवला मतदारसंघाचा आमदार आहे. माझा जन्म येवल्यातील नाही, माझे कुटुंब येवल्यातील नाही. तरी देखील मतदारसंघातील जनतेने मला मागील २० वर्षे आणि पुढील पाच वर्षे आमदारकी बहाल केली. माझी पतंग कुणीही कापणार नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
नांदगाव MIDCमध्ये १०० हुन अधिक कामगारांना विषबाधा झाली असून, महिला आणि पुरुषांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. कंपनीतील पाण्यातून विषाबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कामगारांवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.
परभणी आणि बीड प्रकरणामध्ये भेदभाव होत आहे. आम्हाला न्याय मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा. परभणीला न्याय मिळून देण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. असं कुटुंबियांतील सदस्यांनी मागणी केली आहे.
पुणे- सातारा महामार्गावरील कापूरहोळ चौक येथे महामार्ग पोलीसांकडून वाहन चालक मालकांना रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती अंतर्गत वाहतूक नियमांचे धडे..
रस्ते सुरक्षा विषयक नियमांबाबत पुणे सातारा महामार्गावरील, महामार्ग पोलीस सारोळा यांच्यावतीने राबवण्यात येत आहे रस्ता सुरक्षा अभियान
रस्ते अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन आवश्यक असल्यानं, वाहतूक नियमांविषयी करण्यात येतीय जनजागृती
रस्त्याचा वापर करताना प्रत्येक वाहनचालकाने परस्परांची काळजी घ्यावी, दुचाकी चालविताना नेहमी हेल्मेटचा वापर तर चारचाकी वाहनाने प्रवास करतांना सीट बेल्टचा वापर करावा, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, कानाला हेडफोन लावू नये, गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे याविषयी माहिती देण्यात आली माहिती
वाहन चालवताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करावे, पोलिसांचे आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करून स्वतःला त्यांचा विशेष कार्य अधिकारी असल्याच घोषित करणाऱ्या ठकाला अटक
अजित पवार यांच्या बनावट लेटर हेड चा देखील करण्यात आला वापर
मलबार हिल पोलिसांनी केली प्रवीण साठे नावाच्या ४२ वर्षीय इसमाला अटक
अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर विशेष कार्य अधिकारी असल्याचा होता साठेचा दावा
स्वतः ला सरकारी अधिकारी असल्याच भासवून अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांचा आरोप
आरोपी मूळचा सातारा आल्याची माहिती
तक्रार येताच मलबार हिल पोलिसांनी उल्वे येथून केली अटक
पुण्याचे व्यायासाठी अतुल शितोळे यांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल
सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेटरहेड आणि शिक्याचा वापर करून देखील झाला होता फसवणुकीचा प्रकार
एकनाथ शिंदेंचे प्रकरण ताज असतानाच आता अजित पवारांच्या सही आणि लेटरहेडचा देखील गैरवापर समोर
भावी पोलिसांकडूनच कॉपी चा कानमंत्र,
कानात टाकलेल्या ब्ल्यू-ट्युथद्वारे पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्याला पकडले
कस्तुरबा पोलीस स्टेशन हद्दीतील जयाबेन खोत परीक्षा केंद्रांमधील प्रकार
कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी केली अटक
मोहम्मद शेख असे अटक करण्यात आलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नाव
वर्गाबाहेरून सहकारीच सांगत होते प्रश्नांची उत्तरे
परीक्षेसाठीच्या पर्यवेक्षकांच्या झडतीत प्रकार उघड
फसवणूक व विद्यापीठ कायदा १९८२ अन्वये गुन्हा दाखल
मोबाईल वरून माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू
काल देखील ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच कॉपी प्रकार उघडकीस आला होता
मानपाडा पोलिसांची कारवाई ,दोन सराईत बाईक चोरट्याना अटक
कल्याण डोंबिवली नवी मुंबई परिसरात दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्याना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रितिक बाविस्कर, कुणाल नायडू अशी या दोन चोरट्यांची नावे आहेत .
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना मानपाडा पोलीसाना या दोघांची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे सापळा रचत दोघांना उल्हासनगर येथून अटक करण्यात आली.
या दोघांकडून आतापर्यंत चार गुन्ह्यांची उकल करत चार दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय.
हे दोघेही सराईत गुन्हेगार असून याआधी देखील त्यांना चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली .
अंबाजोगाई जवळील मांडवा घाटात बसचा अपघात
बस कठड्याला अडकल्याने टळली मोठी दुर्घटना
सुदैवाने कोणीही जखमी नाही
अहिल्यानगर -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिशिंगणापूर मध्ये दाखल होणार आहेत...
साडेचार वाजता दौरा रद्द होऊन दुपारीच येणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिशिंगणापूर मध्ये..
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर मध्ये कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त तैनात..
शहांच्या दौऱ्या दरम्यान काही वेळासाठी भाविकांचं दर्शन थांबविणार...
अमित शहा आज अहमदनगर जिल्ह्या दौऱ्यावर
आंबेडकरी जनता आक्रमक.
डाॅ आंबेडकरांचा अपमान करणा-या अमित शहांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार...
श्रीरामपूर येथील कार्यकर्ते शिर्डीकडे निघाले असताना पोलीसांनी घेतलं ताब्यात..
श्रीरामपूर पोलीस ठाण्यात नजरकैदेत..
अमित शहांना शिर्डीत दाखवणार होते काळे झेंडे..
आरपीआयचे दिपक त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतलं ताब्यात...
कार्यकर्ते आणी पोलीसात झटापट...
माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याची दुरूस्ती करावी
या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने नदीपात्रातील पाण्यात आंदोलन केले
बंधाऱ्याला मागील अनेक वर्षांपासून गळती सुरू
अनेक ठिकाणी भिंत्तीला तडे गेले आहेत त्यामुळे गळती सुरू असल्याने पाणी वाहून जात आहे
बहुजन वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.
त्यांनी आज सकाळी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले.
छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण केलाय. समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर सुजात आंबेडकर हे विशाळगडाकडे रवाना झालेत.
खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याचा शस्त्र परवाना केला रद्द..
गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शंभर शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द केले..
यात वाल्मीक कराड याचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.
वाल्मीक कराड याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत..
लाडकी बहीण योजनेबाबत भरत गोगावलेंची मोठी माहिती
1500 रुपये आलेत अजून कॅबिनेटमध्ये तो विषय पारित करायचा आहे, विचाराधीन आहे
पंधराशे बंद होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत
2100 रुपये देत असताना योग्य लोकांना मिळतील
देताना घाई गडबड झाली फोरव्हिलर, टू व्हिलरवाल्यांना पैसे गेले अशा त्रुटी चुका होऊ नयेत म्हणून उशीर होतोय
शहापूरमध्ये शिवशाही बसमधून करोडो रुपयांचे दागिने चोरांनी केले लांपास
मुंबई नाशिक महामार्गावरील घटना
फेमस हाॅटेलवर बस उभी असताना चोरांनी मारला डल्ला
धाराशिव येथे सायबर पोलीस असल्याचे सांगून 21 लाख 73 हजाराची फसवणूक
धाराशिव च्या तेरखेडा येथील संजय ठाकूर या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने केली फसवणूक 21
मोबाईलवर फोन करून तुम्ही पार्सलमधून ड्रग्स मागवले असल्याची धमकी देत केली फसवणूक
धाराशिवच्या सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
एक दिवस खेड्यात मुक्काम करा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सर्व मंत्र्यांना सूचना
भाजपचं खेड्याकडे चला अभियान
खेड्यात मुक्काम करून मंत्री हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार
भाजप प्रदेश कार्यालय सांगेल, त्या गावात असेल मंत्र्यांचा मुक्काम
० बाहेरच्या देशात ऑन द स्पॉट जय महाराष्ट्र केला जातो तसा कायदा आणावा लागेल
० वाढत्या महिला अत्याचार प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
० बदलापुरमधील घटनेनंतर नराधम सुधारतील असं वाटल होतो पण सुधारणा झाली नाही उलट वाढत चाललंय
० आता कोणता कायदा करावा लागेल
० बदलापूर एन्काऊंटर नंतर देखील 7 ते 8 घटना घडल्या
० रोहा शहरात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध
० अत्याचार करणाऱ्या नराधमाला जास्त दिवस ठेवणं योग्य नाही
भंडाऱ्यामध्ये अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी प्रशासन सरसावले.
११ चेकपोस्टवर कडक निगराणी.
महसूल, पोलिसांची संयुक्त पथके
रेती तस्करी रोखण्यासाठी ७ संयुक्त पथके....
सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या पहिल्या विधीला सुरुवात
उत्साही वातावरणात तैलाभिषेक विधी पार पडणार
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात झाली आहे.
आज हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या सात नंदी ध्वजांची मिरवणूक निघणार आहे.
साधारण 5 दिवस या यात्रेचा धार्मिक विधी सोहळा पार पडत असतो.
आज नंदी ध्वज मिरवणुकीनंतर 68 लिंगांना तैलाभिषेक घालून प्रदक्षिणा घातली जाते.
शुभ्र धवल बाराबंदीत मोठ्या संख्याने या यात्रेत भक्त सहभागी होत आहेत.
राखेची वाहतूक करणाऱ्या ट्रकने सरपंचाला उडवले
दुचाकीवरून जात असताना अपघात
सौंदाना गावच्या सरपंचाचा अपघातात मृत्यू
अभिमन्यू क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या सरपंचाचे नाव
मिरवट फाट्यावर झाला अपघात
संतोष देशमुख हत्या प्रकरणात अपडेट
आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मस्साजोग मध्ये ग्रामस्थांची बैठक
संतोष देशमुख यांच्या हस्तेला आज 33 दिवस पूर्ण
यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार
पुण्याच्या भोर तालुक्यातील नवसह्याद्री कॉलेजजवळील नायगाव- देगाव रोडवर, रात्रीच्या सुमारास तरुणांना दोन बछड्यासह बिबट्याचे झाले दर्शन
बिबट्याचा वावर काही तरुणांनी मोबाईल कॅमेरात केला कैद
ह्या रस्त्यावरून गावी परतत असताना बिबटया दिसताच देगांव येथील शुभम शेलार यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात बिबट्याचा वावर केला कैद
या परिसरात अनेक वेळा स्थानिकांना बछड्यांसह बिबट्याचं दर्शन झालंय, तसेच अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ले करून ठार केलंय..
बिबट्याचा वावर वाढल्यानं स्थानिकांच्यात भीतीचं वातावरण
परिसरात वावरताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे स्थानिकांचं आवाहन
नागपूर - केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित खासदार क्रीडा महोत्सवास आजपासून सुरूवात
यशवंत स्टेडियम येथे अभिनेत्री तथा खासदार कंगना राणावत यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले..
आजपासून 2 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जवळपास 80 हजार खेळाडू सहभागी होणार..
शहरातील 73 मैदानात 58 खेळ खेळवले जाणार..
आज दौड स्पर्धा घेण्यात आली... विजेत्या खेळाडूंना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि कंगना रणावत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले
पुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये पडला दुचाकीस्वार
पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजची काम सुरू आहेत.
ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केले आहेत.
दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकीवरून रस्ता शोधत बाहेरपडत असताना दुचाकी उलटली आणि दुचाकीसह चालक ड्रेनेजमध्ये पडला.
किरकोळ जखमी झालेल्या दुचाकी स्वराला आणि गाडी स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
पुणे - मकार संक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्यापद्धतीने नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले.
सहकारनगर, चतु:शृंगी, विश्रांतवाडी, वारजे, मार्केट यार्ड भागात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३६ हजार ८२० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.
- नाशिक शहरात अमली विरोधी पथकाची मोठी कारवाई.
- एम. डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणारे तीन महिला आणि एक पुरुष आरोपी जेरबंद
- नाशिक शहरातील अमृतधाम, पंचवटी परिसरात एमडी हा अमली पदार्थ विकत असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती
- नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून ४ लाख १५ हजार ५०० रुपये किमतीचा ७८.५ ग्रॅम किमतीचा अमली पदार्थ हस्तगत केला तर, इतर 1 लाख 97 हजार हजार 820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला...
- अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नागपूर - केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पाहिला' इमर्जन्सी चित्रपट
नागपुरात पार पडलेल्या प्रीमियर शो ला होते उपस्थित
कंगना रणौत यांनी प्रमुख भूमिका साकारलेला इमर्जन्सी चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो नागपुरात पार पडला
मेडिकल चौकातील वीआर मॉल मध्ये हा पहिला प्रीमियर शो पाहण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या सह कंगना रणौत स्वतः उपस्थित होत्या
सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव निमित्य जनसागर उसळाला
राजमाता जिजाऊ यांचा 427 वा जन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा होत आहे
सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार , केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आकाश फुंडकर अभिवादन करण्यासाठी येणार.
परंपरेनुसार सकाळीच शासकीय महापूजा केली जाते
कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते ही पूजा केली गेली
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.