

पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळील घटना घडलीय. शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. भागूबाई विश्वनाथ खोडदे (वय ७०) असे मयत महिलेचे नाव आहे.
प्रत्येक पक्ष आपआपल्या पक्षाच काम करत होता
काही घटना घडल्या त्या निवडणूक आयोग व पोलीसांनी समाधान होईल या दृष्टिकोनातून काम केल
पालकमंत्री म्हणून जिल्हा शांत राहीला हवा हाच माझा प्रयत्न होता
आज पासून ज्या घटना घडल्या त्या थांबवल्या पाहीजेत
हा पर्यंटन जिल्हा आहे त्याला गालबोट लागायला नको
वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पांगरा शिंदेसह आसपासच्या सुमारे 15 गावांनी हे धक्के अनुभवले. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ तब्बल तीन धक्के बसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजभवनाचं नाव बदलून ‘लोकभवन’ असे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालय (PMO) परिसराचं नवं नामकरणही करण्यात आलं असून, आता हा परिसर ‘सेवातिर्थ’ म्हणून ओळखला जाणार आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते मुक्ताईनगर मध्ये गुंडगिरी करत आहे
हे बोगस मतदार हे शिवसेनेचे आहे
निवडणूक आयोग यांनी याप्रकरणाची दखल घेतली पाहिजे
जळगांव शहरातील विविध भागातून या ठिकाणी गुंड दाखल झाले आहे या बाबत पोलिसांनी दखल घ्यावी - एकनाथ खडसे
जे झाले ते सगळ्यांच्या समोर झाले. कारवाई होणार नाही हे सिध्द झाले. केवळ ढकला ढकली होणार. मालवण पोलीस निरीक्षक यांच्यावर दडपण आहे. पीआय योग्य आहेत, त्यांची चूक नाही. यातील आरोपी सुटतील, हे प्रकरण दाबले जाणार, हे आरोपी मोकाट होणार, मी याबाबत वकिलांशी बोलून पुढील चर्चा करणार, असं निलेश राणे म्हणाले.
मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लग्नबंधनात अडकणार आहेत. उद्योगपती शंभूराज खुतवड यांच्याबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. नुकतीच तिची हळद पार पडली.
प्रभाग क्रमांक १०/२ मधील मतदान प्रक्रिया अर्ध्या तासापासून थांबलेली
ईव्हीएम मशीनला एका विशिष्ट उमेदवाराच्या चिन्हा समोर शाही लागल्याने झाला होता गोंधळ
प्रतिस्पर्धी उमेदवारांनी घेतला आक्षेप
केंद्राध्यक्ष्यांनी याची तात्काळ दखल घेत ईव्हीएम मशीन वरील लागलेली शाही पुसून मतदान प्रक्रिया केली पूर्ववत सुरू
दादर रेल्वे स्टेशनवर एका जोडप्याने नुकतेच लेटेस्ट प्री-वेडिंग शूट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यस्त स्टेशनमध्ये रोमँटिक पोझ देत या जोडप्याने आपल्या ‘जोडीने प्रवासाचा शुभारंभ’ असा संदेश दिला. प्रवाशांनीही या अनोख्या क्षणाचा आनंद घेत मोबाईलमध्ये व्हिडिओ टिपले. रेल्वे परिसरातील हा वेगळा प्री-वेडिंग ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री सध्या जपान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी टोक्यो येथील महात्मा गांधी पार्कला भेट दिली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल हे भ्रष्टाचाराविरोधात होते. त्यांनी नेहमी भ्रष्टाचारविरोधात कडक कारवाई केली, असं सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितले.
विरोधकांना संचार साथी अॅपमध्ये काही अडचणी नसतील, तरी ते शोधून काढतात, असं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे.
प्रोजेक्ट ७५ अंतर्गत ६ सबमरीन्स घेणे ही अॅडव्हान्स स्टेज आहे. असं दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.
केंद्र सरकारने सर्व मोबाईल फोनमध्ये संचार साथी अॅप प्री इन्स्टॉल करण्यास सांगितले आहे, याबाबत आज संसदेत राहुल गांधी बोलणार आहेत.
पुणे -
पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन
भाजप विरोधात शिवसेना आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराजांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी अवमान केल्याप्रकरणी आंदोलन
भाजपच्या पोस्टरवर ऑईल टाकत ठाकरे गटाने केला निषेध
पुण्यातील लाल महाल चौकामध्ये शिवसैनिकांकडून घोषणाबाजी
भंडारा शहरात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला गमजा आणि भाजपची घातली होती टोपी
या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन केला जात आहे
नागपूर -
- नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली
- सर्व मतमोडणी २१ डिसेंबरला होणार
- मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
बोरिवली पूर्व स्टेशनबाहेर बेवारस बॅग आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बॅगची तपासणी केली.
बॅगेत ५० ग्रॅम सोनं आणि ७.५० रुपये लाख रोख रक्कम सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. चौकशीत ही बॅग वडोदरा येथील ७० वर्षीय प्रदीप ननुबाई जोशी यांची असल्याचे निष्पन्न झाले.
लग्नासाठी मुंबईत आलेल्या जोशी यांनी चुकून ही बॅग स्टेशनबाहेर विसरली होती.
पोलिसांनी पूर्ण पडताळणी करून सोनं व रोख रक्कम सुरक्षित स्वरूपात जोशी यांना परत केली, तर जोशी यांनी कस्तुरबा पोलिसांचे मनापासून आभार मानले.
दहिसरमध्ये चार जणांचा तरुणावर हल्ला, तरुण गंभीर जखमी
दहिसर पोलिस स्टेशन हद्दीतील रावलपाडा येथे काल रात्री साडेअकराच्या सुमारास चार जणांनी मिळून एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात त्या व्यक्तीच्या चेहरा आणि गळ्यावर गंभीर व खोल जखमा झाल्या असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे.
मुंबई -
मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई!
बोरीवली राष्ट्रीय उद्यानासमोर पती-पत्नी ‘बंटी आणि बबली’ अटक
त्यांच्या ताब्यातून २ कोटी रुपये किमतीची ५०० ग्रॅम ब्राऊन शुगर (हेरॉईन) जप्त
हे जोडपे ड्रग्ज पार्टी आणि रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवठा करत असल्याचा पोलिसांचा दावा
कांदिवली ANC पथकाची धडाकेबाज कारवाई
मुख्य पुरवठादार शोधण्यासाठी तपास सुरू
कुवेत- हैदराबाद इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी
मुंबई एअरपोर्टवर एमर्जन्सी लँडिंग
विमानातील प्रवासी घाबरले
अहिल्यानगर -
अहिल्यानगर शहरातील बांबू गल्ली परिसरात भीषण आग
सकाळच्या सुमारास लागली आग
आग लागण्याचे कारण अस्पष्ट
महापालिकेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल
कराड -
कराडजवळ सहलीच्या बसला अपघात
पुणे- बंगळुरू महामार्गावर वाठारजवळ बस कोसळली
८ विद्यार्थी जखमी, जखमीवर उपचार सुरू
बस नाशिकच्या महाविद्यालयाच्या सहलीची असल्याची प्राथमिक माहिती
पुणे
खासगी बस चालकांकडून पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली
पुण्यात खासगी बसेससाठी १४ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेला पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली
पुण्यातील ठरवून दिलेल्या थांब्यावर खाजगी बसेस यांना थांबण्याची परवानगी देण्यात आली होती
यवतमाळ -
यवतमाळ जिल्हा गारठला
यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा पारा 10 अंशावर
सर्वात कमी तापमानाची नोंद
दोन दिवसांपासून थंडी वाढली
ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पटल्याचे चित्र दिसतेय
पुणे -
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वराळे येथे बिबट्याचे वास्तव्य आढळून आलाय
शेतशिवारात दिसणारा बिबट आता औद्योगिक क्षेत्रातही दिसायला लागला
द्योगिक क्षेत्रात काम करणारे कामगारही धास्तावलेत
नांदेड -
साधू संताचा अपमान सहन करणार नाही
सयाजी शिंदे पाणी कम चाय आहे
अॅड.गुणरत्न सदावर्ते यांची टीका
वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे यांच्यावर जोरदार टीका
सयाजी शिंदे यांनी साधू संताबद्दल केलेल्या वक्तव्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केली नाराजी
नाशिक येथील कुंभ मेळाव्याला साधू आले गेले तरी काही फरक पडणार नाही असं वक्तव्य सयाजी शिंदे यांनी केले होते.
तसेच वृक्ष तोडीचा सयाजी शिंदे यांनी विरोध देखील केलाय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.