Maharashtra Live News Update: पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे टायर फोडले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५, राज्यात कडाक्याची थंडी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन अपडेट, लोकसभा- राज्यसभा, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Pandharpur: पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटले, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे टायर फोडले

पंढरपूर -

पंढरपुरात ऊस दर आंदोलन पेटले

आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी 4 ट्रॅक्टरचे एकूण 32 टायर फोडले...

ऊस वाहतूक ठेकेदारांचे लाखो रूपयांचे नूकसान...

वाखरी येथे रात्री शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टायर फोडून ऊस वाहतूक रोखली....

Sports: फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी, लिओनाल मेस्सी उद्यापासून ३ दिवस भारत दौऱ्यावर

फुटबॉल चाहत्यांसाठी पर्वणी! लिओनाल मेस्सी उद्यापासून ३ दिवस भारत दौऱ्यावर

मेस्सी भारतात येत असल्याने फुटबॉल चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्साह शिगेला

३ दिवसात देणार भारतातील ४ शहरांना भेटी

कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत मेस्सी चे कार्यक्रम आयोजित

कोलकाता येथे स्वतःच्या ७० फुटी पुतळ्याचे करणार अनावरण

हैदराबाद मध्ये खेळणार एक चॅरिटी फुटबॉल मॅच, मुंबईत सुद्धा लावणार २ कार्यक्रमांना हजेरी

मेस्सी त्याच्या टूर च्या शेवटच्या दिवशी घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Pune: पुणे महापालिकेसाठी आता मनसे मैदानात, आजपासून मनसेचे फॉर्म वाटप सुरू होणार

पुणे -

पुणे महापालिकेसाठी आता मनसे सुद्धा मैदानात

उद्धव ठाकरेंच्या सेनेशी युतीबाबत चर्चा बाजूला ठेवत पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी

आजपासून मनसे चे पुण्यात फॉर्म वाटप सुरू होणार

काल शहर कार्यालयात पार पडली मनसे ची बैठक

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना निवडणूक उमेदवारी अर्ज वाटप सुरू होणार

शुक्रवारी आणि शनिवारी दुपारी ४ ते ७ या वेळात उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया होणार आहे

अर्ज स्वीकृती शनिवार १४ व रविवार १५ या दोन दिवस चालणार

Pune: भाजपमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती, २ हजार ३५० कार्यकर्त्यांकडून तयारी

पुणे -

भाजपमधील इच्छुकांच्या आजपासून मुलाखती

महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपतर्फे सुमारे २ हजार ३५० कार्यकर्त्यांनी तयारी

इच्छुक उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या शहर कार्यालयात शनिवारी आणि रविवारी कोअर कमिटीतर्फे मुलाखती घेतल्या जाणार

यानिमित्ताने एकाच प्रभागातील अनेक स्पर्धक एकमेकांच्या पुढे येणार

पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता

त्यामुळे शहरातील राजकीय पक्षांमधील घडामोडींना वेग आला

Latur: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकोरकर यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकोरकर यांचे निधन

वयाच्या ९० व्या वर्षी दिला अखेरचा श्वास

Nashik: नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला, महापालिकेच्या शाळांच्या वेळेत बदल

नाशिक -

- नाशिकमध्ये थंडीचा कडाका वाढला

- वाढत्या थंडीमुळे महापालिकेच्या शाळांच्या वेळेत बदल

- थंडीमुळे पालिकेच्या शाळा सकाळी ८ वाजता भरणार

- महापालिकेच्या शिक्षण विभागाचा निर्णय, सकाळी ७ ऐवजी ८ वाजता शाळा भरवण्याचा निर्णय

- दुपारच्या सत्राची वेळ मात्र कायम

- खासगी शाळा व्यवस्थापनांना मात्र सक्ती नाही, खासगी शाळांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्याचे निर्देश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com