Live Blog Updates : नायर डेंटल रुग्णालयात 10 व्या मजल्यावर लागली आग

Maharashtra Live News in Marathi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गाजियाबाद दौऱ्यावर, नवले पुलावर विचित्र अपघात, लोकसभा निवडणूक घडामोडी दिवसभरातील बातम्यांचे लाईव्ह अपडेट इथे वाचा...
Latest news in Marathi Mumbai, Pune, Nagpur, Nashik and Over Maharashtra (6 april 2024)
Latest news in Marathi Mumbai, Pune, Nagpur, Nashik and Over Maharashtra (6 april 2024)Saam TV

नायर डेंटल रुग्णालयात 10 व्या मजल्यावर लागली आग

आग छोटी असल्यामुळे फायर सेफ्टी विझवण्यात आले

Shot सर्किट मुळे आग लागल्याची माहिती

आगीमुळे कुठलीही जीवितहानी न झाल्याची माहिती

आगीत सद्या कोणतीही जीवित हानी झाली नाही

आगीनंतर वार्ड रिकामी करण्यात आला आहे

अजित पवार यांनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दिलीप वळसे पाटील यांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे सहकार मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

माजी मंत्री बबनराव घोलप थोड्याच वेळात शिंदे गटात करणार प्रवेश

थोड्याच वेळात माजी मंत्री बबनराव घोलप थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश करणार आहे..मोठ्या संख्येने पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत

एकनाथ खडसेंच्या भाजपप्रवेशावर केंद्रीय समिती करतेय विचार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

एकनाथ खडसे याचं मत भाजपमध्ये येण्याचं मत झालं आहे. सध्या त्यावर केंद्रीय समिती विचार करत आहे. त्यांचा निर्णय झाल्यावर तो निर्णय राज्याच्या समितीकडे येईल. त्यानंतर त्यावर निर्णय होईल⁠. ⁠पक्षात कोणीही येत असेल तर, पक्ष संघटना वाढण्यासाठी कोणी येत असेल, विकसीत भारत संकल्पनेसाठी कोणी येत असेल तर त्यांचे स्वागतच आहे.

ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचा दावा कायम

महायुती करताना काही तडजोडी कराव्या लागतात. परंतु, आपल्या कोणत्याही विद्यमान खासदारांचा अन्याय होणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

आपण धाडस केलं म्हणून अनेकांना सत्तेची फळं चाखता आली . त्यामुळे कुणी कितीही सांगितलं तरी आपलं महत्त्व कमी होत नाही असंही काही आमदार म्हणाले

आपल्या हक्काच्या जागा आपण सोडायच्या नाहीत

बैठकीत आमदारांचा मानस

ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक आपल्या जागा आपण सोडायच्या नाहीत.

मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते.

बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.

भाजप नेते अशोक चव्हाण यांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यानंतर चव्हाण यांनी घेतली शपथ

अशोक चव्हाण यांनी मराठी भाषेत घेतली शपथ

राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम आणि एमआयएमच्या नेत्यामध्ये पुन्हा एकदा बंद दाराआड चर्चा

माजी आमदार रमेश कदम आणि एमआयएमचे सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दि यांच्यात बैठक

सोलापूर लोकसभा निवडणुकीत एमआयएमदेखील उमेदवार देण्याच्या तयारीत आहे

अशातच एमआयएमचे पदाधिकारी आणि माजी आमदार रमेश कदम यांची आठवडाभऱ्यात दुसऱ्यांदा भेट होतेय

सूत्रांच्या माहितीनुसार रमेश कदम यांना एमआयएमच्या माध्यमातून लोकसभा रिंगणात उतरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत

मात्र अद्याप रमेश कदम किंवा एमआयएमकडून याबाबतीत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही

रमेश कदम एमआयएम कडून लोकसभेच्या मैदानात उत्तरले तर सोलापुरात भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित विरुद्ध एमआयएम अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता

छगन भुजबळांच्या बंगल्यावर कुणाची नजर ? भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांनी केली पाहणी

- छगन भुजबळांच्या बंगल्यावर कुणाची नजर ?

- भुजबळांच्या निवासस्थानी पोलिसांनी केली पाहणी

- रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे भुजबळ फार्म टेहळणी केल्याची कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती

- भुजबळांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांने अंबड पोलिसांकडे केली चौकशीची मागणी

- नाशिक पोलिसांकडून तातडीनं चौकशी सुरू

- नाशिकमधून महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू असतांना हा प्रकार घडल्यानं खळबळ

सायन कोळीवाडा चर्च परिसरात गोळीबार

सायन कोळीवाडा चर्च परिसरात गोळीबार

पॅरोल वर सुटून आलेल्या इसमाने केला गोळीबार

पैश्याच्या मागणीसाठी गोळीबार केल्याची माहिती

अँटॉप हिल पोलीस आणि गुन्हे शाखेने केली तपासला सूरवात

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

जम्मू-काश्मीरमध्ये पु्न्हा एका भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिस्टर स्केल मोजली गेली. जम्मू आणि काश्मीरमध्ये २ वाजून ५३ मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले.

नाशिकच्या दोन मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश

ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप , नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांचा जाहीर पक्ष प्रवेश

बाळासाहेब भवन या ठिकाणी पक्ष प्रवेश होणार

देवेंद्र फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार : सदाभाऊ खोत

'महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता. परंतु देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वासाठी हा सदाभाऊ दोन अंगठे देखील द्यायला तयार आहे, एवढी निष्ठा माझी त्या माणसावर आहे, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. ते सांगलीत बोलत होते.

आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांमध्ये झाली १ तास चर्चा

शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यात एक तास चर्चा झाली.

सध्याच्या राजकीय विषयावर आणि मराठवाड्यातील राजकीय चर्चा झाल्याची माहिती

कोर्टाकडून मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच

१८ एप्रिल पर्यंत कोर्टाने न्यायालयीन कोठडी वाढवली

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सिसोदिया आहेत अटकेत

सांगलीच्या जागेवरून असलेला संभ्रम आम्ही लवकर दूर करू : रमेश चेनिथला

सांगलीच्या जागेवर रमेश चेनिथला काय म्हणाले

- सांगलीच्या जागेवरून असलेला संभ्रम आम्ही लवकर दूर करू

- महाविकास आघाडी ही निवडणूक सोबत लढू कधी काही गोष्टी असतात

- जागा वातपातप वर लवकरच समाधान काढू

- चर्चा करून यावर तोडगा काढू

- त्यांनी पत्र काढल असाल तरी काँग्रेस हाय कमांड जो निर्णय घेईल त्याचे पालन सगळ्यांनी केलं पाहिजे

सीईओ प्रवीण माने उद्या राजकीय भूमिका स्पष्ट करणार

सोनाई उद्योग समूहाचे सीईओ प्रवीण माने उद्या राजकीय भूमिका स्पष्ट करणार

काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण माने यांच्या घरी सदिच्छा भेट दिली होती.

त्यानंतर राजकीय चर्चांना इंदापूर परिसरात उधाण आले होते.

पश्चिम बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ला

पश्चिम बंगालमध्ये NIA च्या पथकावर हल्ल्याची घटना घडली. मेदिनीपूर परिसरात पथकावर हल्ला

छापा टाकण्यासाठी गेलेल्या पथकावर अज्ञातांकडून हल्ला

यापूर्वी देखील ईडीच्या टीमवर संदेशखाली परिसरात झाला होता हल्ला.

हल्यात काही अधिकारी जखमी झाल्याची माहिती

कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा

कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी

श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून निवडून आणणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

शरद पवार गटाची तिसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

शरद पवार गटाची तिसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

उरलेल्या तीन लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार?

सातारा, रावेर आणि माढाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

माढातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

साताऱ्यातून बाळासाहेब पाटील यांच्या‌ नावाची चर्चा

रावेरमधून माजी आमदार संतोष चौधरी संभाव्य उमेदवार

विश्वजित आणि विशाल पाटील यांच्याकडून काल रात्री काँगेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट

विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी काल रात्रीच घेतली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल यांची भेट घेत सांगलीच्या जागेवर केली चर्चा

सांगलीच्या जागेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसच अस्तित्व आहे, त्यामुळं ही जागा सोडायला नको... वरिष्ठांकडे मांडली भूमिका

येत्या १-२ दिवसात याचा निर्णय घेऊ... वरिष्ठांकडून दोन्ही नेत्यांना आश्वासन

मैत्रीपूर्ण लढतीच्या दिलेल्या प्रस्तावावर देखील चर्चा

पण मैत्रीपूर्ण लढतीने महाविकास आघाडीवर काय परिणाम होतील, याचा विचार करून निर्णय घेतला जाणार

वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, दोन्ही नेत्यांची भूमिका

थोड्याच वेळात महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल्ला आणि मुकुल वासनिक यांची नागपुरात घेणार भेट

रोहिणी खडसे शरद पवार यांच्या भेटीला

पुण्यात मोदी बागेत शरद पवार भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

रोहिणी खडसे या शरद पवार यांच्या भेटीला पोहोचल्या आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघचा उमेदवारीचा निर्णय होणार का याकडे लक्ष

कोणाला उमेदवारी द्यायची यावर शरद पवारांमध्ये चर्चा

रोहिणी खडसे आज पुण्यात दाखल झाल्या आहेत

माजी मंत्री बबन घोलप शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री बबन घोलप आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदावरून हटविल्यानं घोलप नाराज होते .

बबन घोलप हे शिर्डीतून इच्छूक होते, त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला होता.

बबन घोलप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज चार वाजता पक्षात प्रवेश करणार

बबन घोलप यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही भेट घेतली होती

घोलप हे पाच वेळेला विधानसभेवर निवडून गेलेत, समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी कारभार पाहिलाय

वकिलांना आठवड्यातून पाच वेळा भेटण्यासाठी वेळ मिळावा; केजरीवाल यांची कोर्टाला विनंती

दिल्ली उच्च न्यायालयाकडे केजरीवाल यांची मागणी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोर्टाकडे पुन्हा एकदा मागणी

वकिलांना भेटण्यासाठी जास्त वेळ मिळावा

आठवड्यात पाच वेळा भेटण्याची परवानगी मिळावी - केजरीवाल

आठवड्यातून दोन वेळा वकीलाना भेटण्याची सध्या आहे परवानगी, केजरीवाल यांची कोर्टाला विनंती

महाविकास आघाडीचे जाधव, महायुतीचे जानकरही कोट्यधीश; शेतीसह सोने-नाणेही जवळ

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी झालेल्या छाननीत 41उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले. यात उद्धव ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याकडे 6 कोटी 17 लाख, तर महायुतीचे महादेव जानकर हे 4 कोटी 88 लाखांचे धनी आहेत. यात विद्यमान खासदार जाधव यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत दोन पटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीसह महायुतीचे दोन्हीही उमेदवार कोट्यधीश असल्याचे त्यांनी आपल्या संपत्तीच्या विवरणात नमूद केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com