Lepoard News: महाराष्ट्रातील बिबटे जाणार गुजरातला; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Junnar Lepoard News: गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राणी आणि मानवामध्ये संघर्ष वाढलाय. यात बिबट्या आणि मानवांमध्ये बहुतेकवेळा चकमक होत असते. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये हा संघर्ष सतत पाहायला मिळतो.
Junnar Lepoard News
Junnar Lepoard News

रोहिदास गाडगे, साम प्रतिनिधी

पुणे : गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तव्यासाठी उपाययोजना तयार करण्यात आल्यात. त्यासाठीची केंद्राची परवानगीही मिळालीय, त्यामुळे आता जुन्नरचे बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाहुणे म्हणून जाणार आहेत. जुन्नर वनविभागातील खेड,आंबेगाव शिरुर आणि जुन्नर तालुक्यात मानव आणि बिबट्यांचा संघर्ष वाढलाय. हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाने काही उपाययोजना सुरू केल्यात.

माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे विस्तारिकरण करण्यात आलं याआधीचे 40 आणि नवीन 60 बिबट्यांना या ठिकाणी हक्काचा निवारा मिळालाय. यासोबत AI अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजियन्सद्वारे लक्ष ठेवले जाईल. तसेच १५० नवीन पिंजरे,रेस्क्यू वाहने आणि व्याघ्र प्रकल्पाप्रमाणे स्पेशल प्रोटेक्षण फोर्स वाढवला जाणार आहे. यासोबतच काही बिबटे गुजरातच्या जामनगर येथील सेंट्रल झू मध्ये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली

जुन्नर वनविभागातील बिबट्याची संख्या

२००१ साली.. १५ ते २० बिबटे

२००५ नंतर १०० री पार केली...

२००८ ते २०१० बिबट्याचा वावर क्षेत्र वाढला. त्यानंतर बिबटे खेड,शिरुर तालुक्यात दिसू लागले.

२०२१३ ते २०१५ मध्ये ही संख्या ३०० पेक्षा अधिक झाल्याचं निर्दशनात आलं.

२०१८-१९ मध्ये बिबट्यांची संख्या ४५० च्या पुढे गेली

२०२२ पर्यत बिबट्यांची संख्या ५५० च्या पुढे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

२०२३ -२४ पर्यत बिबट्यांची संख्या ७०० च्या पार गेल्याचा अंदाज आहे.

तर गेल्या ३० वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात ३६ व्यक्तींचा मृत्यु झालाय.

१०८ हुन अधिक व्यक्ती गंभीर जखमी झालेत.

१२ हजारांपेक्षा पशुधनाची शिकार बिबट्यांकडून झालीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com