Breaking Batmya Live : Maharashtra Budget Session : विक्रीला आणलेला कापूस संतप्त शेतकऱ्याकडून पेटवण्याचा केला प्रयत्न

Latest Maharashtra News and Updates in Marathi (8 February 2024): राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक बातम्यांचा संक्षिप्त स्वरुपात आढावा.
Latest news in Marathi on NCP, Farmer Protest, Mumbai, Pune, Nagpur, Nashik and Over Maharashtra (8 February 2024)
Latest news in Marathi on NCP, Farmer Protest, Mumbai, Pune, Nagpur, Nashik and Over Maharashtra (8 February 2024)Saam TV

विक्रीला आणलेला कापूस संतप्त शेतकऱ्याकडून पेटवण्याचा केला प्रयत्न

संतप्त शेतकऱ्याने विक्रीला आणलेला कापूस जिनिंग मध्ये पेटवण्याचा केला प्रयत्न

जिनिंग मधील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने विजविण्यात आली आग

सीसीआयची खरेदी सुरू असताना शेतकऱ्यांच्या सातबारा मध्ये 2023 24 मध्ये पेरा नोंदणी नसल्याने खरेदी केला नव्हता शेतकऱ्याचा कापूस

युवक काँग्रेसकडून नागपूर विद्यापीठात पुन्हा आंदोलन

भाजप युवा मोर्च्याच्या आंदोलनानंतर युवक काँग्रेसकडून नागपुर विद्यापीठात पुन्हा आंदोलन....

युवक कॉंग्रेस आणि भाजपा युवा मोर्च्या यांच्यातील वाद पेटणार...

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाला राऊत यांच्यावर विद्यापीठाचा तक्रारीवरून सावकार यांचा पुतळा जाळला म्हणून गुन्हा दाखल केल्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं.

कोविड काळात महाराष्ट्राचं नेतृत्व घरी बसलं; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरेंवर आरोप

कोविड काळात काही लोक घरी बसले आणि कामे करणाऱ्यांनाही घरी बसवलं,इतर राज्यांनी कामे करून घेतली पण महाराष्ट्राचे नेतृत्व फक्त घरातच बसून राहिलं,त्यामुळे अनेक कामे खोळंबली

लोकसभेत मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर

नवी दिल्ली -

लोकसभेत श्वेतपत्रिका (White paper) सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केली श्वेतपत्रिका

UPA सरकारच्या काळातील गैरव्यवहाराविरोधात श्वेतपत्रिका काढली

Maharashtra Budget Session : २६ फेब्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय‌ अधिवेशन

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. २८ फेब्रुवारी रोजी विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येईल.

माजी आमदाराची मनसेतून हकालपट्टी, राज ठाकरेंनीच काढलं पत्रक

कोकणातील नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांची मनसेतून हकालपट्टी

उपरकर हे मागील कित्येक महिन्यांपासून पक्षासोबत संपर्क ठेवत नव्हते.

मागील अनेक महिन्यांपासून त्यांनी पक्षाच्या कोणत्याही बैठकीला उपस्थिती लावली नाही

उपरकर यांनी यापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे देखील सांगितले जात आहे.

पक्षाने आखून दिलेल्या शिस्तीचे पालन न केल्याचा ठपका ठेवत आज परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी.

स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक केलं प्रसिद्ध

माझी पक्षातून हकालपट्टी झाली अशा बातम्या येत आहेत त्या चुकीच्या आहेत

मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मी दीड वर्षापासून पक्षात सक्रिय नव्हतो. पक्षात जे काही चाललं होत त्याबद्दल मी नाराज होतो माजी आमदार परशुराम उपरकर यांची प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर

पुणे

राज ठाकरे १० आणि ११ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा

पुणे लोकसभेसाठी मनसेकडून अनेक जण इच्छुक

शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसे नेते बाबू वागस्कर, वसंत मोरे यांची नावं आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या दिल्लीतील पक्ष कार्यालयावरील घड्याळ चिन्ह काढलं

नवी दिल्ली -

पक्षाचं चिन्ह असलेला घड्याळाचा झेंडा पक्ष कार्यालयावरून काढला

युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी आज काढला झेंडा

अजित पवार यांच्याकडे पक्षाचा ताबा गेल्याने दिल्ली कार्यालयात बदल

दिल्लीत लोधी इस्टेट येथे आहे कार्यालय

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाचे छापे

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाची धाड

मुंबईतील अंधेरी येथील घरावर आयकर विभागाची धाड

कर चुकवल्याप्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घराची झाडाझडती

कुणाल राऊत यांच्यावर गुन्हा

नागपूर

युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

नागपूर विद्यापीठाच्या तक्रारीनंतर अखेर अंबाझरी पोलिसात गुन्हा दाखल

कुणाल राऊत यांनी विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता

आज भाजप युवा मोर्चाने विद्यापीठात कुणाल राऊत यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन केलं होतं

त्यानंतर विद्यापीठाने कुणाल राऊत भाजपा युवा मोर्चाचा विरोधात कारवाईची मागणी केलीय.

त्यावरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शरद पवार उतरणार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार

शरद पवार दिल्लीतून आल्यानंतर पुढच्या आठवड्यात लागणार कामाला

शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा होण्याची शक्यता

बाबा सिद्दिकी १० तारखेला अजित पवार गटात करणार प्रवेश

माजी मंत्री बाबा सिद्दीकी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. सिद्दीकी यांनी आज, गुरुवारी एक्स पोस्टद्वारे काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

अंधेरी येथील घरावर आयकर विभागाची धाड

माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घराव आयकर विभागाची कारवाई

रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर १५ फेब्रुवारीला निर्णय

बुलढाणा

रविकांत तुपकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, येत्या १५ फेब्रुवारी रोजी निर्णय

रविकांत तुपकर यांचा विविध गुन्ह्यांत जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी न्यायालयात केली आहे याचिका

आज जिल्हा व सत्र न्यायालयात या याचिकेवरील सुनावणी पूर्ण

न्यायालय परिसरात तुपकर यांच्या समर्थकांची गर्दी

राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून नावांची चाचपणी

नवी दिल्ली -

काँग्रेसकडून दोन-तीन नावांवर विचार सुरू

अर्थतज्ज्ञ रघुराम राजन, उद्योगपती राहुल बजाज यांच्या नावांची वरिष्ठ पातळीवर चर्चा

राज्यसभेचा उमेदवार राज्यातील असावा असा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांचा सूर

लवकरच एका नावावर होणार शिक्कामोर्तब

विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हीला माहिती

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या पत्नी आणि मुलाचा अटकपूर्व जामीन लांबणीवर

शासनाची बाजू मांडणारे वकील आज न्यायालयात अनुपस्थित

न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठासमोर झाली सुनावणी

एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनाकरिता राजन साळवी यांची पत्नी आणि मुलगा उच्च न्यायालयात

जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्यानंतर घेतली होती उच्च न्यायालयात धाव

अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यात मेळावा

पुणे

शरद पवार गटाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर पुण्यात पहिलाच मेळावा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार मार्गदर्शन

पक्षाला नवे नाव मिळाल्यानंतर पहिला मेळावा

पुण्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील अध्यक्ष, सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित

INDIA आघाडीची लवकरच मुंबईत सभा

लवकरच इंडिया आघाडीची सभा मुंबईत होईल, विजय वडेट्टीवार यांची माहिती

आमची इच्छा आहे की राहुल गांधी यांच्या यात्रेच्या समाप्तीवेळी ही मोठी सभा घ्यावी

हे निश्चित झालं नाही, मात्र प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटावा अशी आमची इच्छा आहे, वडेट्टीवार यांची इच्छा

विधानसभेचं विशेष अधिवेशन १५ फेब्रुवारीला, मराठा आरक्षणासाठी विधेयक मांडण्याची शक्यता

१५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन

अधिवेशनात मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार

नव्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा करण्याची शक्यता

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता

धान घोटाळ्यात एकता सहकारी संस्थेचे १२ संचालक अडकले

भंडारा जिल्ह्यात अनेक धान घोटाळे उघड होत आहेत. जिल्ह्यात धान खरेदी केंद्रांनी धान खरेदी केली पण राईस मील मालकांना भरडाईकरता धान दिलं नसल्याने उघड.

सहकारी संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करून शासनाला भरडाईसाठी विकण्याच्या कामात २१ लाख ६२ हजार रुपयांचा घोटाळा

भंडारातील एकता बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या १२ संचालकांवर गुन्हे दाखल

जिल्हा पणन अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कारवाई

INDIA आघाडीची दिल्लीत एकत्र बैठक होणार

INDIA आघाडीची दिल्लीत एकत्र बैठक होणार

बैठकीला राज्यातून उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार

जागावाटप वर अंतिम शिक्कामोर्तब दिल्लीत होणार

याच महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता

साम tv ला सूत्रांची माहिती

पुणे : सासवड तहसील कार्यालयातून मतदान यंत्रे चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक

पुणे : सासवड तहसील कार्यालयातून मतदान यंत्रे चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक

भैय्या उर्फ शिवाजी रामदास बंडगर आणि अजिंक्य राजू साळुंखे हे दोन आरोपी पुरंदर तालुक्यातील माळशिरस या ठिकाणचे रहिवासी

सासवड येथील तहसील कार्यालयातील स्ट्रॅांग रुमचे कुलूप तोडून आतमध्ये ठेवलेले मतदान यंत्र मंगळवारी चोरी केल्याचे उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती

या प्रकरणात प्रांत, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार यांच्यासह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा

उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

दौऱ्याला युवक काँग्रेसकडून विरोध होईल, त्यामुळे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा

कोणत्याही प्रकारचं आंदोलन करण्यास परवानगी नाही

सोशल मीडियात काँग्रेसची बॅनरबाजी

पोलिसावर हात उचलणाऱ्या आमदाराचा सत्कार करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत

सागर बंगल्यावर बसणारे बॉस देवेंद्र फडणवीस येत आहेत अशी बॅनरबाजी

युवक काँग्रेसची जोरदार बॅनरबाजी

वसंत मोरेंकडून पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी

वसंत मोरेंकडून पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी

आज पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीचे संकेत देणार स्टेटस

"आता सगळेच म्हणू लागलेत, पुणे की पसंत मोरे वसंत" वसंत मोरे यांचा स्टेटस

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेत इच्छुकांची संख्या वाढली

मंत्री छगन भुजबळ यांच्यावरोधात मराठा संघटना आक्रमक

मंत्री छगन भुजबळ यांच्यावरोधात मराठा संघटना आक्रमक

छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती ठोका मोर्चाचे पदाधिकारी घेणार राज्यपालांची भेट

छगन भुजबळ मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असल्याचा संघटनेचा दावा

दुपारी तीन वाजता राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत भुजबळांच्या तात्काळ रजिनामच्यामी मागणी करणार

भुजबळ सतत चिथावणीखोर भाषणे करूण जातीय सलोखा बिघडव असल्याचा मराठा संघटनेचा दावा

अहमदनगरमध्ये काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का, जिल्हाध्यक्ष आणि महिला जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

अहमदनगर : काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी दिला राजीनामा

कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार प्रवेश

अनुराधा नागवडे या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणूक लढणारच, राजेंद्र नागवडे यांचा निश्चय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com