सचिन गाड
आयसीस महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणी एनआयएकडून धाड सत्र सुरूच आहे. अशात या प्रकरणी आज पुन्हा एकदा पोलिसांनी पडघ्यातील बोरीवली गावात कारवाई केलीये. लग्नाचा (Wedding) मुहूर्त साधून एनआयएने नाचन कुटुंबातील नातेवाईकाच्या लग्नसमारंभा आधीच धाड टाकलीये. लग्नानिमित्त सगळे संशयित एकाच ठिकाणी असल्याचा फायदा उचलत एनआयएने ही कारवाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सगळे संशयित बेसावध असताना एनआयएने ही धाड टाकली. पडघ्याशेजारी असणाऱ्या बोरीवली गावात लग्न होतं. लग्नाची तयारी ऐन रंगात असताना आणि सर्व नातेवाईक लग्नसोहळ्यासाठी एकत्र आले असतानाच एनआयएने छापेमारी केली. त्यामुळे साऱ्यांचीच धांदल उडाली. नाचन कुटुंबातील काही आरोपी या लग्नाला जाणार होते मात्र त्याआधीच त्यांच्यावर छापेमारी आणि अटकेची कारवाई झाली आहे.
एनआयएच्या (NIA) कारवाईमुळे गावात खळबळ उडाल्याने अटक केलेल्या कुटूंबातील सदस्य या लग्नाला गेले नाहीत. शिवाय पोलिसांची नजर असल्याने बाहेरूनही काही लोकांनी येणं टाळलं, अशी माहिती मिळालीये.
शानिवारी झालेल्या कारवाईत एनआयएने या प्रकरणी साकिब नाचनसह एकूण १५ जणांना अटक केली. साकिब नाचन 2002-2003 हा रेल्वे बॉम्ब ब्लास्टमध्येही आरोपी म्हणून अटक झाली होती. यात त्याची निर्दोष सुटका झाली. साकिबचा मुलगा शामिललाही पुणे आयसीस प्रकरणी अटक झाली होती. आरोपींना एनआयएने दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर केले. आयसीस महाराष्ट्र मॉड्युल या प्रकरणी आणखी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी थेट लग्नसमारंभात धाड टकत कारवाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.