12 ते 15 वर्षांच्या मुलांचं लसीकरण करण्याचा केंद्राकडे आग्रह - राजेश टोपे

लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील - राजेश टोपे
Rajesh Tope on Covid Vaccination for 12 to 15 children
Rajesh Tope on Covid Vaccination for 12 to 15 childrenलक्ष्मण सोळुंके
Published On

मुंबई - आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे त्या पार्श्ववभूमीवर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुलांना लस देण्यास सुरुवात झाली. आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना प्रत्येक शहरात तसेच ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. आज जालना शहरातील महिला व बाल रुग्णालयातून आरोग्यमंत्री यांनी मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली.

हे देखील पहा -

लहान मुलांच्या लसीकरणाचे चांगले परिणाम होतील. आता 12 ते 15वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मागणी केंद्राकडे केली आहे.अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटल आहे ते जालन्यात बोलत होते. आज जालन्यात टोपे यांच्या उपस्थितीत लहान मुलांना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते.

राज्यात ओमायक्रॉन रुग्ण वाढले असले तरी लॉकडाऊनची परिभाषा प्रत्येक राज्यात वेगळी आहे.त्यामुळे लॉकडाऊन बाबत राज्यांना समान निकष असायला हवे असंही टोपे म्हणाले.मुलांच्या लसीकरणाची मोहीम शाळेत राबवण्याची आमची ईच्छा होती पण लसीकरणामुळे लहान मुलांना काही त्रास झाल्यास तात्काळ उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे दवाखान्यात लसीकरण केलं असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

Rajesh Tope on Covid Vaccination for 12 to 15 children
चिंता वाढली; देशात गेल्या 24 तासांत 33,750 नवे कोरोना रुग्ण...

राज्यात सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक कार्यक्रमात गर्दी टाळावी असंही टोपे यांनी सांगितल.कोरोना वाढत असल्यानं प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.केंद्र सरकारने वैद्यकीय सुविधेसाठी 23 हजार 123 कोटी रुपयेनिधी निधी राज्यांना दिला होता त्यावर राज्यांनी फक्त 17 टक्के पेक्षा कोणत्याही राज्यानेवापरला नाही असआरोप केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केला. यावर बोलताना टोपे यांनी खर्च कसाही करून चालत नाही. त्याचं नियोजन करावं लागतं. हा निधी खर्च करण्यासाठी आढावा बैठक घेणार असल्याचे देखील टोपे म्हणाले.

लॉकडाऊन बाबत सर्वच राज्यांना समान प्रोटोकॉल लागू करावा अशी मागणीही केंद्राकडे केली असल्याचं ते म्हणाले.शाळेमध्ये लसीकरण करण्यासाठी लवकर निर्णय घेऊ असंही टोपे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com