बारामती : आंबा, नारळ या झाडांच्या माध्यमातून पैसा मिळताे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणातील प्रकल्पांमध्ये रस्त्याच्या कडेला या प्रकारची झाडे लावली जाताहेत. त्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच मिळाली. त्यावर एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणातून ठीक आहे, सरकार पण तुमचंच आहे परंतु सरकारला (maharashtra government) लुटू नका जितका (खरा) माेबदला हवा तितका घ्या पण असं वागू नका असा सल्ला संबंधितांना दिला. deputy cm ajit pawar speech from baramati viral in social media
बारामती येथील माळेगावात राजहंस संकुल संस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले एका ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाच्या या ठिकाणी लोकांनी रस्त्याच्या कडेला झाडे लावलीत. ज्यांना जमिनीचा भाग या रस्त्यात जात आहे. बराेबर तेथेच लोकांनी आंब्याची, नारळाची झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एकही झाड लावले नाही. मी प्रांतधिकारी यांना विचारलं तेव्हा त्यांनी आंबा, नारळ याची झाडे लावली की त्याची (जमिनीची) किंमत वाढते. त्यामुळे लोक अशा प्रकारी झाडे लावतात असे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ठीक आहे सरकार पण तुमचंच आहे परंतु सरकारला लुटू नका जितका माेबदला हवा तितका घ्या. झाड, विहीर, घराचा जितका माेबदला असेल तितका तुम्हांला मिळेल पण हे अशा पद्धतीने वागू नका अशी खंत उपमुख्यमंत्र्यांनी शेतक-यांविषयी व्यक्त केली. त्यापुढं अजित पवार म्हणाले सरकार काही नाेटा छापत नाही. कराच्या रुपातुन आलेला पैसा असताे. त्याच पैशातून विकासकामे केली जातात. त्यामुळे तुम्ही याची जाणिव ठेवून वागावे असे आवाहनही त्यांनी शेतक-यांना केले.
एसटीची सेवा सुरु हाेण्यासाठी प्रयत्नशिल
दरम्यान एसटी कर्मचा-यांना जितके देता येईल तितके आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. जितका मार्ग काढायचा आहे. तितका आम्ही मार्ग काढला आहे. परंतु आता संप मिटला पाहिजे. गाेर गरीबांच्या मुला बाळांना बस लागते. गाेर गरीब जनतेला शहरात येण्यासाठी बस लागत असते. परंतु काही जण आजही एसटी कर्मचा-यांना भडकवताहेत. त्यामुळे कर्मचा-यांचा हट्टीपणा वाढला आहे. केवळ बारामतीत नव्हे तर पुणे विभागात, राज्यात एसटीची सेवा सुरु झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्नशिल आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.