Maharashtra Government: आमदार-खासदारांसोबत कसं वागावं? अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान

Maharashtra Government Issues Conduct Order For Bureaucrats : आमदार आणि खासदारांशी कसे संवाद साधावा आणि कसे वागावे. यासाठी महाराष्ट्र सरकारने अधिकाऱ्यांसाठी 9-कलमी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जर अधिकाऱ्यांनी हे नियम पाळले नाहीत तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
Maharashtra Government Issues Conduct Order For Bureaucrats :
MAHARASHTRA GOVERNMENT ISSUES 9-POINT PROTOCOL FOR OFFICERS ON DEALING WITH MLAS AND MPSsaam tv
Published On
Summary
  • धिवेशनात विशेषाधिकारभंगाच्या तक्रारी वाढल्याने हे नियम लागू

  • प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न

  • विरोधकांनी या आदेशाला राजेशाही फर्मान म्हटलंय.

विधीमंडळ आणि संसदेच्या अधिवेशानात आमदार, खासदारांच्या विशेषाधिकाराचा मुद्दा गाजतो. मात्र आता याच आमदार आणि खासदारांसोबत कसं वागावं, याबाबत राज्य सरकारने अधिकाऱ्यांसाठी 9 कलमी राजेशाही फर्मान जारी केलंय. मात्र हे नियम काय आहेत? पाहूयात.

आमदार, खासदारांना आदर आणि सौजन्याची वागणूक द्या

आमदार, खासदार ऑफिसमध्ये आल्यास आदराने उठून अभिवादन करावं

आमदार, खासदारांशी फोनवर बोलताना शिष्टाचार पाळावा

स्थानिक पातळीवर भुमीपूजन, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावं

आदेशाचं उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार

सरकारी अधिकाऱ्याने आपलं काम सोडून आमदार, खासदारांच्या खिदमत करण्याचे नियम जारी केल्यानं मनसेनं त्याचा चांगलाच समाचार घेतलाय.

खरंतर आमदार, खासदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. मात्र अनेकदा मग्रुर अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याचं समोर आलंय. आता थेट 9 कलमी फर्मान काढून आमदार, खासदारांसाठीच्या या राजेशाही थाटाची खरंच गरज आहे का? कारण अनेकदा प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रास देण्यासाठी सरकारच्या या राजेशाही फर्मानाचा गैरवापर करण्याची शक्यता आहे. त्याचाही विचार व्हायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com