Maharashtra Election: 'त्या' विधानावरुन त्यांची निती आणि नियत दिसते; फडणवीसांनी घेतला राऊतांचा समाचार

Maharashtra Election: महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा भाजपच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. आज त्यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी दर्यापूर येथे प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी संजय राऊत यांनी नवनीत राणांवर केलेल्या विधानाचा समाचार घेतला.
Devendra Fadnavis In Daryapur
Devendra Fadnavis In DaryapurFacebook

(अमर घटारे , अमरावती)

Devendra Fadnavis In Daryapur Amravati : येथे कोणीही येतो आणि आमच्या बहिणीचा अपमान करून जातो. त्यांच्या विधानावरुन त्यांची नीती त्यांची नियत कशी आहे? हे दिसतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर केली. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेत संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. राऊतांनी केलेल्या विधानावरून त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जातेय. भाजपच्या महिला कार्यकर्त्यां आक्रमक झाल्या असून संजय राऊतांच्या निषेधार्थ आंदोलन करत आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांचा समाचार घेत थेट त्यांची नियत भरसभेत काढली. यामुळे नवनीत राणा प्रकरण शांत होईल असं वाटत नाही.

आपल्या भाषणाची सुरुवात करताना देवेंद्र फडणवीस यांनी मोदींना जिंकवण्यासाठी नवनीत राणा यांना मतदान करा असं आवाहन मतदारांना केले. ही निवडणूक विधानसभा, जिल्हापरिषदेची नाहीतर देशाचं नेतृत्व कोणाकडे द्यायचं हे ठरवणारी आहे. आपआपल्याला देशाचं नेतृत्त्व पंतप्रधान मोदींकडे सोपवयाचं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या नावापुढील बटन दाबा जेणेकरून ते मत मोदींना मिळेल. जर तुम्ही काँग्रेसचं बटन दाबलं तर ते मत राहुल गांधी यांना मिळेल हे लक्षात ठेवा असं फडणवीस म्हणाले.

संजय राऊतांवर टीका

येथे कोणीही येतो आणि आमच्या बहिणीचा अपमान करून जातो. त्यांची नीती त्यांची नियत कशी आहे? हे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर घाणाघात केलाय. तोच मुद्दा धरत फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार म्हणातात, राम मंदिरात सीतेची मूर्ती नाही, त्यामुळे महिला नाराज आहेत. पण ते बालरामाचे मंदिर आहे बालरामाच्या मंदिरात सीता कशी असेल? हे तुम्हाला समजत नाही का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरेंवर टीका

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्याने जोर धरलाय. पहाटेच्या शपथविधीनंतर आता शिवसेना भाजप युतीतील दुराव्याचा विषय चर्चेत आलाय. दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये विधानसभेच्या निवडणुकीआधी नेमकी काय चर्चा झाली होती, यावरून सुरू झालेलं राजकारण पुन्हा सुरू झालय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी दिल्लीत जातो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत, त्यांना वेड लागलंय असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा केलेला दावा खोडून काढला.

Devendra Fadnavis In Daryapur
Uddhav Thackeray: फडणवीस म्हणाले होते, आदित्यला CM पदासाठी तयार करतो; मी दिल्लीला जातो.. उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा दावा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com