Raj Thackeray
Raj ThackeraySaam Tv

Raj Thackeray News: "...हेच फक्त माझं स्वप्न आहे"; महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट

Maharashtra Din: महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर खास पोस्ट केली आहे.

Raj Thackeray Tweet on Maharashtra Din: आज ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. आजचा हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील 80 पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो. १ मे १९६० साली स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. शिवाय या दिवशी कामगार दिनही साजरा करण्यात येतो. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर खास पोस्ट केली आहे. (Latest Marathi News)

Raj Thackeray
Girish Mahajan: बॅनर लावून तेवढ्यापुरते समाधान, आकडा आणा मुख्‍यमंत्री व्‍हा; मंत्री गिरीश महाजन यांचा टोला

आज ६३ वा महाराष्ट्र दिन आहे. यानिमित्ताने त्यांना कसा महाराष्ट्र अपेक्षित आहे हे या व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जनतेला सांगितले आहे.आज सकाळीच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याकरता ट्विटरवर (Twitter) एक व्हिडीओसहित पोस्ट शेअर केली आहे.

या व्हिडीओमध्ये ते म्हणतात की, “जे मी जगात पाहिलंय ते मी महाराष्ट्रात आणू इच्छितो. अख्ख्या जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, हेच फक्त माझं स्वप्न आहे.” तसेच “आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा” असा संदेशही या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आले आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्र दिन साजरा करण्यामागचा इतिहास

1 मे 1960 रोजी भारताच्या तत्कालीन नेहरू सरकारने बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट 1960 अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये मुंबई (Mumbai) प्रदेशाचे विभाजन केले. बॉम्बेबाबतही दोन राज्यांमध्ये वाद होता.

मराठी लोक म्हणाले की बॉम्बे त्यांना दिले पाहिजे कारण तेथील बहुतेक लोक मराठी बोलतात तर गुजराती लोकांना असे वाटते की, मुंबई ही त्यांच्यामुळेच आहे. कालांतराने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली.

बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये विभागणी करण्यात आली. दोन्ही राज्यात बॉम्बेबाबत अनेक वाद झाले आणि त्यानंतर मुंबई राज्याला महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com