राज्यात कोरोनाच्या जेएन.१ व्हेरियंटने पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत चाललीये. अशात नाशिकमध्ये २ नवीन रुग्ण सापडलेत. नाशिकच्या सिन्नरमध्ये पुन्हा दोन महिला कोरोना बाधित आढळ्या आहेत. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चाललीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या ३ दिवसांपूर्वी सिन्नरमध्ये २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा २ रुग्ण आढळल्याने रुग्ण संख्या ४ वर पोहचली आहे. कोरोनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं कोरोना चाचणी करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
अमरावतीमध्ये देखील पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. पाच नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद आरोग्य प्रशासनाने केली आहे. 52 संशयित रुग्णांचे सँपल संत गाडगे बाबा विद्यापीठ प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आलाय.
यातील दोन रुग्ण अमरावती शहरातले आहेत तर तीन रुग्ण हे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी माक्स आणि कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात कोरोनाची रुग्ण संख्या ८ वर पोहचली आहे. महानगरपालिकेकडून मागील दहा दिवसात ९५५ चाचण्या करण्यात आल्यात. छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोणाच्या रुग्ण संख्येत वाढ होत चाललीय. शहरात आठ जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाअसून हे आठही रुग्ण होम आय सोलेशनमध्ये असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागान दिलीय.
मागील दहा दिवसांत छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये ९५५ जणांची चाचणी करण्यात आलीय. त्यात ४१२ जणांची RTPCR चाचणी तर ५४३ जणांची अँटीजीन चाचणी करण्यात आली असून त्यात रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.