पालिका निवडणुकीत पैशांचा पूर? तुमच्या मताचा रेट किती?

Lakshmi Visits Before Voting: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीत आता पैशांचा महापूर आल्याची चर्चा रंगलीय... मंत्र्यांकडून घरोघरी लक्ष्मीदर्शनाबाबत वक्तव्य केले जात आहेत.. या पैसे वाटपाचं रेट कार्ड साम टीव्हीच्या हाती लागलंय.. मात्र तुमच्या मताची किंमत किती?
Cash-for-vote allegations intensify as Maharashtra civic polls witness shocking vote rate revelations.
Cash-for-vote allegations intensify as Maharashtra civic polls witness shocking vote rate revelations.Saam Tv
Published On

नगरपरिषदेच्या मतदानाच्या आधीच्या रात्री लक्ष्मीदर्शन होणार असल्याचं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं... मात्र आता पैसे वाटपाच्या सुरस कहाण्याच राज्यभरातून समोर येत आहेत.... सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका मतासाठी तब्बल 10 ते 15 हजार रुपये वाटले जात असल्याचा आरोप थेट माजी मंत्री दीपक केसरकरांनी केलाय... तर चंद्रपूरमध्येही एका मतासाठी 5 हजारांचा रेट सुरु असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकरांनी केलाय..

मुद्द्यावरुन गुद्द्यावर आलेल्या या निवडणुकीत पैशांचा महापूर आल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून केला जातोय... तर राजकीय नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतांचं रेट कार्डच समोर आलंय....

सिंधुदुर्ग -

1 मताची किंमत- 10 ते 15 हजार

संभाजीनगर

नवखा उमेदवार- 2 ते 5 हजार

प्रस्थापित उमेदवार- 10 हजार

नाशिक

त्र्यंबकेश्वर - 5 हजार

नांदगाव - 3 हजार

मनमाड- 1 हजार

सिन्नर, भगूर, इगतपुरी- 500 ते 1 हजार

भोर नगरपरिषद - 5 ते 6 हजार

सासवड नगरपरिषद- 3 ते 5 हजार

फुरसुंगी नगर परिषद 5 ते 6 हजार

जेजुरी नगरपरिषद 3 ते 5 हजार

बारामती नगरपरिषद 2 ते 4 हजार

विदर्भ

गणपती मंडळ, तरुण मंडळ- 25 हजार ते 1 लाख

प्रति व्यक्ती मत- 1 ते 2 हजार

समाजातील प्रभावी नेते- 2 ते 3 लाख

प्रभावी नेत्यांचा मतदारसंघ- 5 हजार

सुशिक्षित भाग- 3 ते 5 हजार

कामगार वस्ती- 1 ते 2 हजार

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत वाटण्यात येत असलेल्या पैशांचं रेट कार्ड समोर आल्यानंतर ठाकरेंनी हा सत्तेचा माज असल्याची टीका केलीय...खरं तर लोकशाहीत निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवणं अपेक्षित आहे... कारण पैसे न घेतलेला व्यक्तीच आपले प्रश्न सत्ताधाऱ्यांपुढे मांडू शकतो...मात्र राजकीय नेते निवडणूकीत पैसे फेकून लोकांचं फक्त मत नाही विकत घेण्याचे मनसुबे आखत आहेत.. मात्र राजकीय नेते पैसे वाटून मत नाही तर तुमचा स्वाभिमान विकत घेत आहेत.. त्यामुळे मतदारांनी स्वाभिमान विकून गुलामाचं जीणं जगायचं की पैसे वाटणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची... याचा विचार करायला हवा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com